Sunday, August 25, 2019

वावटळ७

अनेक वेळा डोक्यात विचार एकाच वेळेस कल्लोळ करतात व वावटळी सारखे डोक्यात फिरत राहतात त्यांचा एकमेकाशी कसलाही मेळ नसतो.अशीच एक वावटळ .    





‘वावटळ’
नेहमी प्रमाणे सकाळचा ‘शुभ प्रभात’ चा
संदेश गेल्या बरोबर त्या पाठोपाठ
दुसरा संदेश माझ्या नियमित ब्लॉग वाचकाचा,
म्हणजेच बहिणीचा आला ‘बऱ्याच दिवसात
काही लिहिले नाहीस’ काहीतरी उत्तर द्यावयाचे
म्हणून लंगडी सबब पुढे केली,
पण लिहावयाचे नक्की केले.
पण काय?
वह्यांचे बाड काढून बसलो पण काहीच
खास ‘विचार’ खरडलेले आढळले नाहीत,
जे काही होते त्याची ‘वावटळ’ मध्येच
गणना होती.
तर ही ती  ‘वावटळ’

‘आत्मा’
स्वप्नात? जाग? आली तेव्हां मी त्रिशंकू सारखा
अधांतरी लटकत होतो, ना धरती ना आकाश
मग लक्षात आले मी शरीर सोडले होते
व मी ‘आत्मा’ रुपात भटकत होतो.

मुखवटा 
जन्मदात्यांनी दिलेला मुखवटा एका ठराविक
काळापर्यंत मिरवतो आणि नंतर जसे वय वाढते तसे  प्रसंगानुसार मुखवटे बदलत रहातो, मग आपला खरा मुखवटाच 
आपण हरवतो
मग कधीतरी एकांतात...
तो सावलीसारखा डोकावतो,
पण पुन्हा त्यालां वापरण्याचे धैर्य,
फार थोड्यांनाच जमते.

ताजा तवाना!
मेंदू बुरसट  होऊ नये म्हणून
एक जालीम उपाय रोज
दिवसातून दोन वाक्य लिहावीत,
चार वाक्य वाचावीत,
व आठ वाक्ये स्मरावीत.
तरच तो राहील ताजा तवाना!

रस्ता 
रस्ता सापडत नाही म्हणून हताश
होऊ नये जोमाने दुसरा रस्ता शोधावा
नाहीच मिळाला तर स्वतःतयार करावा.

Monday, August 5, 2019

रिकामे मडके


   
अंदाजे २५ दिवस होत आले पण
माझे मडके मात्र रिकामे,विचारात ३ आठवडे गमावले.
आज ठाम विचार केला काही झाले तरी
मेंदूला गदा गदा हलवून,जागृत करून,
बाहेर पडणाऱ्या मुसळधार सरी पासून
प्रेरणा घ्यावयाची व ब्लॉग मध्ये काहीतरी
खरडायचे. पण काय?
निसर्गाने कोप केलाय त्यावर ...?
कश्मीर राजकारण... नको नको...
ज्यात समज नाहीत्यात नाक खुपसू नये 
आईची शिकवण,मग खेळ विशेष वर...? 
नकोरे बाप्पा!सर्वांनाच खेळ थोडेच आवडतात?
JJच्या नवीनच, प्रथमच,अंगीकारल्या
भूमिकेबद्दल? नको...नको...
आता तर थोडी मुलांशी ओळख होतेय,
प्रत्येकाच्या मेंदूच्या सुरुकत्यांची शिरगणती 
मीच घेतोय,मग त्यावर लिहिण्यास अजून 
६ महिने तरी लागतील...ह्याचाच अर्थ...
‘थांबला तो संपला काळपुढे चालला
धावत्यास शक्ती येई आणि रस्ता सापडे...’

आता उपाय एकच धावत रहाणे.
bhag arun bhag...


चाफा आणि सोनटक्क्याचेअबोल प्रेम

 मी पाहिलंय ते अबोल प्रेम,    ते देखील दुतर्फी, विचार करा १ नाही तर ५ वर्षे  त्याचे रोज तिच्या बाकावर  नियमितपणे ती यावयाच्या पूर्वीच  हळुवा...