Showing posts with label confidence. Show all posts
Showing posts with label confidence. Show all posts

Tuesday, September 11, 2018

आत्मविश्वास









दरड कोसळलीय

वाहतूक खोळम्बलीय
‘कशाला निघतोस आज?
आठवड्याने जा
सर्व काही सुरळीत
पूर्ववत होईल मग जा’
असे दिवसांचे भाकीत
करणार्यांचे कौतुक वाटते
ह्यांना भविष्याची केवढी खात्री
व केवढा विश्वास
आठवड्याने दरड कशावरून
नाही कोसळणार ?
पुढचा आठवडा  
आपण बघणारच ह्याचा
केवढा आत्मविश्वास,
पण काही म्हणा
हा दांडगा आत्मविश्वासच
तुमचे आमचे आयुष्य वाढवितो.
उद्याची सकाळ पाहणारच
ह्या खात्रीने भविष्यातील
स्वप्ने रंगवितो आणि येणाऱ्या दिवसाचे
गणित बिनधास्तपणे मांडतो.





पाणी शोधताना..

पाणी शोधताना... एकदा एका चिमणीला तहान लागली. ती खिडकीवर येऊन बसली. आत डोकावून पाहते तर एका काचेच्या भांड्यात पाणी दिसले. पाणी पाहताच तिच्या ...