Friday, August 22, 2025

"ना भूतो ना भविष्यती "




"गेले वर्ष भर मी माझ्या ब्लॉग्स चे पुस्तकात रूपांतर करण्यास झटत आहे. होय खऱ्या अर्थाने.वयोपरत्वे शुद्ध लेखन तपासणे माझ्या साठी एक भयानक स्वप्न झाले आहे. 

असो.आज वर्षाने ब्लॉग लिहिण्याचा योग आला तो देखीलआला नसता जर 

'अगा जे घडलेच नाही' असा प्रकार झाला नसता. नक्की माहित नाही पण असा प्रकार देशात प्रथमच झाला असावा.

पहिली ५ वर्षे फुशारक्या मारणाऱ्या,उत्तम डिझायनर कपडे दिवसातून ३ वेळा बदलणाऱ्या, येणाऱ्या जाणाऱ्या परराष्ट्र प्रमुखांना मिठ्ठया मारणाऱ्या,काळा पैसा १ वर्षातआणण्याचे वचन देणाऱ्या, अचानक नोट बंदी करणाऱ्या, करोना सारख्या विश्व व्यापी आजारावर उपाय म्हणून जनतेस थाळ्या वाजवयास लावणाऱ्या,कर्ज काढून बँकांचे दिवाळे वाजवणाऱ्याना 'चल उड जा रे पंछी' म्हणत काणा डोळा करणाऱ्या, 'निरोध' सारख्या जनसंख्येस आळा घालणाऱ्या वस्तू वर देखील GST लावणाऱ्या, जातीय वाद भडकवणाऱ्या, शेतकऱ्याना न जुमानणाऱ्या, मणिपूर मधील आग डोंबाकडे "अगा जे घडलेच नाही"दृष्टिकोन असणाऱ्या,पृथ्वी भ्रमण १० वा ग्रह बनून सतत फिरणाऱ्या, देशाचे करोडो उडवणाऱ्या, गादीचा मोह न सुटणाऱ्या, विरोधी पक्षाची गाऱ्हाणी न जुमानणाऱ्या, "हम करे सो कायदा" वर्तणूक असणाऱ्या सुरुवातीचे खोटे मुखवटे फाटल्यावर लोकप्रियतेला ठिगळे लावून फिरणाऱ्या, हरता हरता कुबड्या शोधून उभा राहणाऱ्या,आपल्याच मित्राना देश विकणाऱ्या, आवश्यक लढाया बलवान देशाच्या सांगण्यावर बंद करणाऱ्या, व जशी विरोधकांच्या आगीची झळ लागल्यावर पळ काढणाऱ्या,  आपल्या हाताशी सर्व पाळीव मंत्री मिरवणाऱ्या, अरे हो स्वतःचे सेल्फी दुसऱ्या कडून काढून घेण्याचा नाद असणाऱ्या, तडीपार माणसास आपला उजवा हाथ बनवून गृहखाते सोपविणाऱ्या ह्या देश रखवाल्याचे २१  ऑगस्ट २०२५ ला संसदेत प्रवेशाचे स्वागत  विरोधकांनी नाऱ्याने केले.

नारे होते "वोट चोर गद्दी छोड" "वोट चोर गद्दी छोड". ह्या हुन अधिक लोकशाहीत होणारा अपमान भारताच्या ७६ व्या स्वतंत्र वर्षां मध्ये "ना भूतो ना भविष्यती " होणे नाही पण त्याच बरोबर "निर्लजम सदा सुखी हे जनतेस विसरून चालणार नाही.

आपले राष्ट्रीय ब्रीद वाक्य 'सत्यमेव जयते' बदलण्याची वेळ न येवो हि प्रार्थना.

No comments:

Post a Comment

तू आहेस!!!!

  तू आहेस !!!! तू आहेस तरी कोण? थोड्यावेळासाठी समजा, मी तुझे अस्तित्व विसरलो, मग हे विश्वास न बसणारे चमत्कार कोण करतो? उत्तराची सुई तुझ्या द...