tv वरील जाहिराती बघणे हा माझा छंद,
... परवा शुद्ध मीठाची जाहिरात लागली ती अशी
एक बाई सुपर मार्केटच्या पैसे देण्याच्या ठिकाणी
विकत घेतलेल्या जिनसा पट्यावर ठेवत असते
counterवरील बाई वस्तू न्याहाळत असते,
जसे मिठाचे pack येते त्यावर...
आणि मीठ मात्र साधे?
गृहिणी: म्हणजे?
सेल्सवूमन: मिठही शुद्ध घ्या हे पहा अमुक...मीठ
सेल्सवूमन: मिठही शुद्ध घ्या हे पहा अमुक...मीठ
यात जरा देखील रसायने नाहीत ...
जाहिरात पहिली मात्र आणि मनात गणित मांडले,
अशुद्ध रसायनवाले मीठ १ किलो घेतल्यास
त्यात रसायनाचे प्रमाण ‘क्ष’असेल समजा,
१ किलो= १००० ग्राम
मीठ ४ जणांच्या कुटुंबास अंदाजे
३० दिवस चालले तर एका माणसास एका दिवसाला ८. ३४ ग्राम
मीठ दिवसास वापरात येते
मीठ दिवसास वापरात येते
जर १००० ग्रा.मध्ये क्ष% रसायन तर ८.३४ ग्रा. मध्ये किती?
अंदाजे
०.००८३४ एवढे सुक्ष्म रसायन प्रत्येकी पोटात जाईल
ह्या सुक्ष्म प्रमाणात रसायन पोटात गेल्यास मनुष्यास
किती त्रास किती दिवसाने/ वर्षाने होईल हे आपण ठरवायचे.
कमीत कमी १०% नक्कीच,ह्यास तुम्हीच तुमच्या
पुढील महीन्याच्या खर्चात मिळवा म्हणजेच
महिन्याच्या किराणा खर्चातकिती वाढ होईल ह्याचा हिशोब करा,
पुढील महीन्याच्या खर्चात मिळवा म्हणजेच
महिन्याच्या किराणा खर्चातकिती वाढ होईल ह्याचा हिशोब करा,
मग लक्षात येईल की हि केवळ जाहिरातबाजीने
भीती घालून केलेली लूटमार आहेहे सुज्ञास सांगणे न लगे.
जाहिरात क्षेत्रात दीर्घ काल असल्यामुळे
एक महत्वाचे गुपित सांगतो,
बहुधा ८०% जाहिराती ह्या तुम्हाला
१.भीती २.हाव ३.भावना ह्यावर
आधारलेल्या असतात. उरलेल्या
२०% वस्तूच्या गुणधर्मावर.
आता पुढील गणित तुम्ही सोडवा
जाहिरातीतील मीठ घेणारी बाई अंदाजे ४५ वर्षे
मीठ विकणारी बाई अंदाजे ३२ वर्षे
शुद्ध मीठ बाजारात आल्याचे साल २०१९
ह्या दोघीच्या पोटात आज पर्यंत किती %रसायने
अशुद्ध मिठाने गेली असतील? त्याचा त्यांच्यावर
किती परीणाम झाला असेल?
केवळ भीती घालून केले ना तुम्हाला मूर्ख?
ग्राहका जागृत रहा!
Liked it.
ReplyDeleteWell written!
ReplyDeletethank you aheela thank u Dayanand
ReplyDelete