Monday, June 3, 2019

पेहचान कौन


काल रात्री,नेहमीच्या वेळेस,  
डोळे मिटून बिछान्यात येऊन पडलो,
बराच वेळ झाला, कां कुणास ठाऊक
झोप काही केल्या डोळ्यातून मेंदूत शिरत नव्हती,
चाचपडत सेल फोन शोधला  फोनवर
श्रेया घोशालला अंगाई  गीत गाण्यास बोलाविले
ती गाऊन दमली आणि गेली




झोपेचे झालेले खोबरे तसेच,  
मग जुन्या मित्राला महमदला गा सांगितले
तोही चांगला तासभर  गायला असावा,दमला,
पण मेंदूचे घुबड काही झोपेना,
सेल फोनला विश्रांती दिली  
एव्हाना पहाटेचे ३ वाजून गेले
आकडे मोजून झाले, मेंढ्या मोजल्या,
मग पंतप्रधान मोदींचे नवे मंत्री मंडळही
नव्याने निवडले त्यांचा शपथ विधीही 
पार पाडला झोपेच्या आशेने,आता मनाचा टी वी बंद केला,
तरीही झोप येईना मग स्वतःच
“ निंबोणीच्या ...”गुण गुणलो तरीही...
जागते रहो... कानात घुमतच होते
किल किल्या डोळ्याने घड्याळ पहिले चार वाजले
ध्यानाची उत्तम वेळ म्हणून उठून बसलो
पण ध्यानासाठी तनमन तयार होईनात
मग तसाच डोळे घट्ट मिटून झोप येईल 
ह्या आशेने बसून राहीलो, एव्हढ्यात...
शांततेत रात्रपाळीच्या पाहरेकऱ्याच्या
फोनवरून गाण्याचे बोंल कानावर पडले
मी कुत्र्यासारखे कान टवकारले कानोसा घेत
गाण्याचे सुमधुर आवाजातील बोल ऐकू लागलो  
स्मित हास्य करीत बसल्या स्थितीतून हळू हळू खाली सरकत गेलो
डोके उशीवर कधी घरंगळले...
...जाग आली तेव्हां आता वाजले की बारा परिस्थिती !!
एवढ्या सुमधुर आवाजाची किमया/जादू/
जगाच्या पाठीवर कोठेही असणे अशक्य
 ते जादूचे गाणे...
धीरे से आजा री अंखियनमे
निन्दिया आजा री आजा, धीरे से आजा
छोटेसे नैन की बगीयन मे...
गायक? पहचान कौन.,.

1 comment:

  1. वा वा कया बात है.आखिर लता दीदी के(अलबेला-१९५२) गाने पे सो गये :):)

    ReplyDelete

चाफा आणि सोनटक्क्याचेअबोल प्रेम

 मी पाहिलंय ते अबोल प्रेम,    ते देखील दुतर्फी, विचार करा १ नाही तर ५ वर्षे  त्याचे रोज तिच्या बाकावर  नियमितपणे ती यावयाच्या पूर्वीच  हळुवा...