आला, आला आला वारा!
सोसाट्याचा वारा !!
ताड नाही पडला
माड नाही पडला
नारळ नाही हल्ला...अरेरे
छत्रपतींचा 35 फुटांचा पुतळा
मात्र पाडून गेला,
सुरु झाला कल्ला,
कसा पडला! पडला कसा!
कोण म्हणे वारा कोण म्हणे पाऊस
जनतेस प्रश्न पडला???
नारळ का नाही पडला????
आले मंत्री आले संत्री
बोटे एकमेकाकडे दाखवू लागले,
बनवला कोणी? कोणी? कोणी?
तो कुणाचा कोण? चर्चेला आले उधाण,
याचा मित्र, त्याचा भाऊ, त्याचा नातू,
या गोंधळात,
शिल्पकार फरार, शोधू कोठे?
नौदल, पोलीस चक्रावले,
महाराजांसमोर गुढघे टेकून,
खालच्या मानेने हा मंत्री, तो मंत्री, माफी स्तर सुरु झाले,
झालेला गोंगाट दिल्लीत पोहचला
जनतेचा कैवार मिळवण्यास, धावत आले पंतप्रधान,
महाराजांची लोटांगणा सहित माफी मागितली एक डोळ्याने,
दुसरा डोळा इलेक्शन वर ठेवून.
महाराजांच्या कमजोर पुतळ्या प्रमाणे
तीन पायाचे सरकार पडेल कि काय?
याचे भय वाढू लागले,
तीन दिशेला तिघे गेले,
विरोधकांवर आरोपाच्या फैरी झाडू लागले,
विरोधकांना कारण मिळाले,
जोडा मारो आंदोलन छेडले,
सुज्ञ जनता समजावयाचे ते समजून गेली,
रोज मरे त्याला कोण रडे?
No comments:
Post a Comment