कधी कधी विचार भरकटतात त्यातील हि एक भरकट.
दोन गोष्टी साध्या, पण आचरण्यास कठीण
पहा प्रयत्न करून परत
मागण्याचा
केलेले प्रेम व
दिलेले दान
आहे का कोणाची
बिशाद परत
मागायची?
ह्या वर एकचउपाय
करत रहा, करत रहा
निस्वार्थी प्रेम
करत रहा निस्वार्थी दान
जीवनाचा अर्थ ह्यातच शोधत
रहा,
-------------------------
कुणीतरी
मला विचारले तू कोण?
मी त्यास उलट विचारले तू कोण?
उत्तर आले मी त्रिकोण
मी उत्तरलो मी चौकोन
आपल्यातील फरक
फक्त १८० अंशाचा
पण गणितज्ञासाठी
मात्र जमीन अस्मानाचा!!
-----------------------
सत्य असत्य
आपल्यावर लादले जाते
त्याची जाण होईपर्यंत
आयुष्याचा खेळ संपत येतो.
----------------------
No comments:
Post a Comment