Tuesday, October 23, 2018

वेळ आणि लाटा






येणारच होती...
ती वेळ देखील येऊन ठेपली
आज आमच्यावर, उद्या तुमच्यावर, अटळ हि वेळ
ही वेळ खरी खोटी करणे कठीण
कुठली सांगू?... 
“आमच्या वेळी ना...”हीच ती वेळ
१ रुपयाला ४ डझन केळी...
फक्त ३ रुपये मुंबई ते रत्नागिरी बोटीचे तिकीट...
अशा वेळेला ऐकणाऱ्याने मान डोलावून
“होय महाराजा”मनात म्हणायचे
सांगणाऱ्याच्या काळात आपण जाणे अशक्य!!
आता आली माझी वेळ सांगायची
“आमच्या वेळी ना...”
मुंबई चे रस्ते रोज धुवायचे,
१ आण्यात ग्रांट रोड ते दादर टी टी ट्राम तिकीट,
घर भाडे केवळ १० रुपये महिना 
आमच्या वेळेचे ५ रु. म्हणजे आजचे ५०० रु,
वगैरे ,वगैरे , वगैरे ...
 तुमच्या काळातील आय फोन फक्त १ लाखात...
घेताना देखील आम्ही पहिले,
आता तुम्ही वाट बघा तुमच्या वेळेची
त्या वेळेस ऐकणाऱ्याला
५.८ मिलीयन डॉलर्सची ‘बुगाटी दिवो’
देखील स्वस्त वाटेल.
गम्मत अशी की,
आमची वेळ तुमची आणि
तुमची वेळ आमची
जगाच्या अंता पर्यंत येतच राहणार.

वेळ आणि लाटा,कधीच थांबणार नाहीत.

No comments:

Post a Comment

चाफा आणि सोनटक्क्याचेअबोल प्रेम

 मी पाहिलंय ते अबोल प्रेम,    ते देखील दुतर्फी, विचार करा १ नाही तर ५ वर्षे  त्याचे रोज तिच्या बाकावर  नियमितपणे ती यावयाच्या पूर्वीच  हळुवा...