देवांना देखील मरण असते.
३० नव्हेंबर २०१८
५:३० ला tv ऑन केला,बातमीत प्रसिद्ध संगीतकार गीतकार
श्री. यशवंत देव, देवाघरी गेल्याचे ऐकले. आणखी एक देव (माणूस) गेल्याचे दुखः झाले. श्री यशवंत देव म्हणजे उत्कृष्ठ संगीतकार,उत्कृष्ठ गीतकार उत्कृष्ठ शिक्षक,उत्कृष्ठ निवेदक,उत्कृष्ठ विडम्बनकार, आणि बरेच काही उत्कृष्ठ ...
एक अमुल्य संगीत खजाना सोडून गेले. वयाच्या केवळ ८ व्यावर्षी सतार वाजवायचे शिक्षण न घेता केवळ वडिलांना वाजवताना पाहून पहिल्यानेच रेडीओवर जो वाजवतो व वाह वाह मिळवतो तो देव माणूसच असला पाहिजे. ज्या माणसास नोकरी देखील मिळते ती देखील ‘आकाशवाणीत’
तो देव माणूसच असला पाहिजे.
दिवस तुझे फुलायचे...तुझे गीत गाण्यासाठी ...शुक्र तारा...मन पिसाट...अशी अवीट गोडवा असलेली अनेक भावगीते संगीतबद्ध करतो तो देव माणूसच असला पाहिजे. ह्या देव माणसाचे पहिले वहिले सिनेमातील गाणे ‘तू नजरेने हो म्हटले ..’पण आजही बर्याच जणांच्या ओठावर असते, ज्या माणसास लता बाईनी म्हटलेल्या श्री गणेश आरती शेवटी मंत्र पुष्पांजली म्हणावयास आमंत्रित केले जाते तो देव माणूसच. ओशो उवाच ‘समोर आलेल्या क्षणा पुरते जगणे’ हा देव माणूस पूर्णपणे अंगीकारून होता.एका मुलाखतील त्यांचे एक वाक्य जीवनाचे मर्म सांगून जाते,
‘हातावर एक वेळ धन रेषा नसली तरी हरकत नाही,
पण ओठावर स्मित रेषा मात्र कायम ठेवा’
अशा देव माणसास कधीही मरण नसते.
श्री. यशवंत देव तुम्ही अमर रहाल.
No comments:
Post a Comment