Tuesday, November 6, 2018

दिवाळी





दीन दीन दिवाळी गाई म्हशी ओवाळी...

आली आली दिवाळी,पाहटे काळोखात उठा,
घनश्याम सुंदराने... स्वागत करा दिपावलीचे

आकाश कंदिल लावा,पाटा भोवती रांगोळी काढा
आईकडून,उटणे लाऊन ओवाळून घ्या ,
पायाखाली महिषांसुराला चिरडा,आसुरी आनंद घ्या
गरम पाण्याने स्नान करा,छान छान कपडे करा,
देवाच्या पाया पडा. वडीलधाऱ्याचे आशीर्वाद घ्या,
ताई, माई घरापुढे गेरू सारवा, ठिपक्यांची रांगोळी काढा
घर भर पणत्या लावा,फुलबाजे अनार, भुईचक्राची
लवंगीची, शेजारच्या बाब्या बरोबर मजा लुटा,
एकमेकास शुभेछा द्या.
भूक लागली भूक लागली करीत
फराळाला बसा लाडू, करंजा,अनारसे, शंकरपाळे,
चकली, कडबोळे, शेवेचा स्वाद घ्या,
पोटभरून गोड गोड ढेकर द्या,
चांदोबा ते दीपावली मासिकांची
पेंगत पेंगत पाने चाळा, जेवणाची
वाट पाहत व्यापाराचे डाव टाका,
बिजली, पाणी, मार्केट खरेदी करा,
आलाच कंटाळा तर सापशिडी खेळा,
नाहीतर आहेच पाच तीन दोन,
किंवा आपला गुलाम चोर.
पाडवा मात्र आई अण्णांचा
आईच्या खुश चेहऱ्याचा
आली भाऊबीज ताई, माई,शिलाला,
आईनेच दिलेली ओवाळणी हसत मुखाने करा,
लाडूचा घास विसरू नका, संपली दिवाळी
आली तशी गेली दिवाळी,संपली  सुट्टी.
घरचा अभ्यास पूर्ण करा,
दर दिवाळीची ही कहाणी,
कंटाळा कधी न आला.
स्मरणात मात्र आठवणीचा दीप कायम तेवत राहिला. 

दीन दीन दिवाळी गाई म्हशी ओवाळी... 






































































No comments:

Post a Comment

चाफा आणि सोनटक्क्याचेअबोल प्रेम

 मी पाहिलंय ते अबोल प्रेम,    ते देखील दुतर्फी, विचार करा १ नाही तर ५ वर्षे  त्याचे रोज तिच्या बाकावर  नियमितपणे ती यावयाच्या पूर्वीच  हळुवा...