वावटळ
अनेक वेळा डोक्यात विचार एकाच वेळेस कल्लोळ करतात व वावटळी सारखे
डोक्यात फिरत राहतात त्यांचा एकमेकाशी कसलाही मेळ नसतो.अशीच एक वावटळ .
1} तुझ्या कडे पहात मनातील सर्व प्रश्न,
चुटकी सरशी नाहीसे होतात की सुटतात?
अशी काय जादू आहे तुझ्यात?
इतरांमध्यें का नाही?
2} आणखी एक दिवस उजाडला
हात लिहिताना नाही थरथरला!
हस्ताक्षर उगाचच हसू लागले.
3} "कोणास ठाऊक?"
ह्याचे उत्तर, पहा प्रयत्न करून सापडते का?
हा प्रश्न विषय सम्पवायचे एक उत्तम शस्त्र
पहा वापरून समोरचा घायाळ होऊन जाईल.
"कोणास ठाऊक?"
हा प्रश्न म्हणजे"कापूस कोंड्याची गोष्ट"
"आज पाऊस पडेलसा वाटतो",
"कोणास ठाऊक?"
"मुख्यमंत्री बदलेल का हो?"
"कोणास ठाऊक?"
थोडक्यात "कोणास ठाऊक?"
हा प्रश्न म्हणजे कुलूप,
अथवा
"मला तुमच्याशी बोलावयाचे नाही."
4] नाते
एक नसुटणारा गुंता,
कधीही ना सुटणाऱ्या
अहंकाराच्या गाठी,
एक वेळ दोन देशातील तंटे बखेडे मिटतील
पण नात्यातला तिढा सुटणे
रुसवे फुगवे दूर होणे,
पिढ्या न पिढ्या अशक्य.
कारण...
अतिशय शुल्लक असते
पण अहंकार हिमालया एव्हढे उंच.
No comments:
Post a Comment