Tuesday, October 9, 2018

दिवा स्वप्न









शाळा,अभ्यास माझ्या व्याख्येत कंटाळा.
माझ्यासाठी शाळा ही एक दिवा स्वप्ने बघण्याची जागा होती.
त्या ‘तारे जमीन पर ‘मधील मुलासारखी.
तासाच्या सुरवातीस ५ मिनिटे लक्ष मग ‘खयालोमे.
मी ११वी पास कसा झालो 
हे एक मलाच पडलेले कोडे आहे.

लहानपणापासून मला कुठलेही 
घरकाम करावयास आवडायचे
आजही आवडते, कारण तो वेळ म्हणजे
मधली सुट्टी, मी मनन, चिंतन,
विचारांचे मंथन मन मोकाट दिवा स्वप्नात गुंग.

आज, रविवारीही तसेच झाले,
घरातील कपड्यांना आज इस्त्री करा हो,  
बायकोचे फर्मान सुटले,   
कपड्यांचा ढीग पाहून खुश झालो
चला आता तास दीड तास माझा (स्वगत)
सुरुवात केली आणि मी दीड तास कुठे कुठे फिरलो
केवळ गम्मत म्हणून ऐका ...
इस्त्री तापण्याचा अवकाश  आणि
विचारात नसलेली राणी मुखर्जी मनात अवतरली,
हि स्वतः इस्त्री करत असेल का?
आमिरच्या  घरात किती नोकर असतील?
कधीतरी कंगना आपल्या घरात 
खुर्चीवर बसली असेल का?
की पलंगात पडून सर्व कामे सांगत असेल?
सचिन चीनला गेला असेल का?
सोनाली कुलकर्णीचा शिंपी कोण असेल?
मला तैल चित्रे जमतील का?
गरोदर लुसिला या वेळेस किती पिल्ले होतील
बँकेत पास बुक कधी टाकावी?
कान अवार्ड्स साईट बघायची राहिली आहे
उद्या ऑफिसची डेडलाईन आहे
नवे कॅम्पेन प्रेझेंट करांवयाचे आहे,
शाह रुखने कधी कणकेचा लाडू खाल्ला असेल का?
एका पाठो पाठ असे वाऱ्याच्या  झुळूके सारखे
प्रत्येक कपड्या गणिक विचार फिरत होते
इस्त्रीचा ढीग कधी संपला कळलेच नाही
मी मात्र स्वप्नात छान रमलो.


  







1 comment:

चाफा आणि सोनटक्क्याचेअबोल प्रेम

 मी पाहिलंय ते अबोल प्रेम,    ते देखील दुतर्फी, विचार करा १ नाही तर ५ वर्षे  त्याचे रोज तिच्या बाकावर  नियमितपणे ती यावयाच्या पूर्वीच  हळुवा...