Saturday, September 8, 2018

पितृछत्र








ऐन तारुण्यात पितृछत्र हरवले,
पितृछत्र म्हणजे काय
याची जाणीव झाली.
रोज दिसणारी व्यक्ती अचानक
कायमच्या सुट्टीवर जाते,
हाक मारणारा आवाज
ऐकूच येत नाही आशीर्वादाचा हात
डोक्यावरून फिरत नाही
गाऱ्हाणे ऐकणारे कान बहिरे होतात
अशाप्रसंगी...हृदयात जपलेल्या
पितृ प्रतिमेशी स्वगत करून
आयुष्याचे गाडे ढकलावे लागते.
आज बघता बघता...

५१ वर्षे उलटली.






2 comments:

  1. अरुण, तुझी प्रत्येक कविता एक नवीन रूप घेऊन सामोरं येते. एक नवीन अविष्कार घडवते. पितृछत्रातील भावना डोळे ओलावतात, तर मोत माउली भक्तिभावाने हात जुळवायला लावते. तुझे भाग्य तिने तुला स्वतःच्या जवळ जागा दिली.
    आणि तुझा कोट्याधीश... चेहरा डोळ्यासमोर नसताही त्याला तू उभे केलेस...कसा असेल याचे वर्णन त्याच्या आठवणीतून पाहीले. खरोखरीच तुझी प्रतिभा बहरत आहे. अशीच बहरू दे. सुगंध वाटत पसरू दे !

    ReplyDelete
  2. No words. Everything is fresh in mind even after fifty one years..

    ReplyDelete

चाफा आणि सोनटक्क्याचेअबोल प्रेम

 मी पाहिलंय ते अबोल प्रेम,    ते देखील दुतर्फी, विचार करा १ नाही तर ५ वर्षे  त्याचे रोज तिच्या बाकावर  नियमितपणे ती यावयाच्या पूर्वीच  हळुवा...