एके दिवशी काय झाले
विचारांच्या घोड्यावर बसून
मी झालो राजा ना हुजरे ना प्रजा
एकटाच फिरत होतो महालात
राजाच्या रुबाबात
मारली हाक टाळी वाजवीत
“कोण आहे रें तिकडे?"
आदळली हाक माझीच
माझ्या कानावर
विसरलो होतो, न हुजरे न तैनात
दिले उत्तर स्वतःच “हुकुम महाराज”
हळू आवाजात, ओशाळत
दिवा स्वप्नाचा फुगा फोडत... येत भानावर
स्वगत करीत 'महाराज उतरा जमिनीवर
आणि चला कामावर'.
Khupach chhan 'abhas', prtekachya manat asa ek raja dadla asto, kadhi to amitabha asto tar kadhi salman, kadhi nayak tar kadhi khalnayak. sundar rupak zale ahe.
ReplyDelete