आयुष्याचा रिमोट
तो वरचा, न देताच जन्मास घालतो
तोच सुरवात करतो
जीवनाचे टी वी चे च्यानल.
बदलत राहतो,
आपले बालपण डिस्ने ने
सुरुवात करतो व ६० ओलांडली
की ब्रह्मकुमारी पर्यन्त्
मधल्या तारुण्याच्या टप्यात
शिक्षण,खेळ, नाच, गाणे,
बातम्या,सिनेमा, फॅशन,
जगभरातील पाक कृती.
कधी,कधी...जग प्रवास घडवतो,
४०शी ओलांडली आयुष्य निरोगी कसे
ठेवावे,
याची आठवण करून देतो.
योग आणि
स्वास्थ्याचे धडे
आपल्या कडून गिरवून घेतो,
जीवनाचे महत्व न समजल्यास,
एकाद दोन झटके देवून
सावध करतो.
तेव्हां शहाण्याने समजून घ्यावे की
सावधान! आपली बॅटरी
त्याने बदलली
आहे.
आता नवे अवसान आणून,
त्याच्या आज्ञेनुसार भक्ती,व आरोग्य,
च्यानलची परिक्रमा चालू ठेवावी.
शेवटी त्याला च्यानल बदलायचा कंटाळा आला
की झाला तुमचा टी वी ...?
Agree completely.
ReplyDelete