Tuesday, September 18, 2018

अशी पाखरे येती...


रोजच्या शिरस्त्या प्रमाणे
फेरफटका मारून समुद्रा जवळील 
रोजच्या बाकड्यावर बसून लाटांचा
शिवाशिवी चा खेळ पाहत होतो
त्या बरोबर मनात देखील
आठवणीच्या लाटाआपटत होत्या.
बघता बघता सूर्यनारायणाकडे लक्ष गेले,
राव डुबकी घेण्याच्या तयारीत होते
सूर्याजीने बुडी मारली देखील,
एवढ्यात एक मोठी लाट
मनात उसळली...
आयुष्याच्या टप्या टप्या वर
भेटलेल्या व्यक्ती हृदयास स्पर्श करून
सुर्यनारायाणा सारख्या बुडी मारून
विस्मरणाच्या समुद्रात 
केव्हा नाहीशा होतात ते कळत देखील नाही 
एकांतात यातील एखाद्याची लाट
आठवणीच्या किनार्यावर आपटते.
त्या व्यक्ती बरोबर घालवलेला वेळ,
गमती जमती ह्या एका 
वाळूच्या किल्ल्यासारख्या आकार घेतात
एवढ्यात दुसरी लाट परतताना
किल्ल्यास उध्वस्तकरून किनार्या पासून दूर नेते. 
आणि  नकळत गाण्याच्य दोन ओळी
ओठातून अस्पष्ट उमटतात...

अशी पाखरे येती आणिक
स्मृती ठेवुनी जाती...
दादा...

वाढ दिवसाच्या शुभेच्छा! 


No comments:

Post a Comment

चाफा आणि सोनटक्क्याचेअबोल प्रेम

 मी पाहिलंय ते अबोल प्रेम,    ते देखील दुतर्फी, विचार करा १ नाही तर ५ वर्षे  त्याचे रोज तिच्या बाकावर  नियमितपणे ती यावयाच्या पूर्वीच  हळुवा...