का होते ओळख? का होते मैत्री?
आता भेट नाही कधीच नाही
हसणे नाही, सुंदर कविता वाचन नाही,
रात्रौ पहाटेचे एस एम एस नाहीत
कोट्याधीश गेला ...
आता फक्त आठवणी चघळायच्या...
घाईने धावणारे ढग
त्यांचा बदलणारा रंग
तापलेल्या धरतीस सुखावणारे,
पानावर पडणारे पहील्या पावसाचे थेंब,
आभाळा कडे पहात हसत जन्म घेणारा अंकुर,
झर्याचे खळखळ निखालस हसणे,
हळुवार उमलणारे फुल,
पावसात वेड लावणारा निसर्ग...
ज्याने पहायला शिकवले आभाळ,सूर्य,चांदण्या,ढग...
येणाऱ्या प्रत्येक पावसाळ्यात निसर्ग
कसे वेगळे रूप घेतो ते.
मित्रा,
तुझे पेन नेले आहेस ना बरोबर
जमल्यास कळव स्वर्गातील
निसर्ग कसा दिसतो ते.
No comments:
Post a Comment