Friday, September 7, 2018

वाढदिवस






                          आज सकाळी चर्च मध्ये केलेली सजावट 




८ सप्टेम्बर. आज मोत माउली चा जन्मदिवस.

समुद्र सपाटी पासून ८० मीटरवर एका टेकडीवर हे चर्च वसले आहे. 
थोडक्यात ह्या चर्चचा इतिहास असा;
आज हे चर्च जरी १०० वर्ष जुने असले तरी १६व्या शतकात जेसुट पाद्रीपोर्तुगाल वरून मत माउलीचा पुतळा जेव्हा  घेऊन आले तेव्हा  अरबी चाच्यानी त्यावर असलेल्या सोन्याच्या  मुलामाच्या हव्यासापोटी पुतळ्यास त्याचा उजवा हात कापून विद्रूप केले. 
नंतर १७६० साली ह्या चर्चचे पुनर्वसन केले  शेजारीच असलेल्या अँऩ्ड्रयुज चर्च मध्ये मेरीच्या पुतळया जागी ‘our lady of navigators’ह्या मूर्तीची स्थापना केली.
१७०० व १७६० च्या सुमारास एका कोळ्यास स्वप्नात समुद्रात मेरी चा पुतळा तरंगताना दिसला
व दुसरेदिवशी त्याचे स्वप्न खरे ठरून त्यास खरोखर मूर्ती तरंगताना मिळाली. व जेसुट ह्यास एका १६६९ मध्ये एका पत्राद्वारे दुजोरा देतात. येथील कोळी जमात मेरीस ‘मोत माउली’ ह्या नावाने सम्बोधू लागले. म्हणजे ‘मोत्याची आई’ व नंतर मोत्याचा अपभ्रंश होऊन इतर मोत माउली  म्हणू लागले.
दर वर्षी लाखो सर्व धर्मीय भक्त या दिवसापासून ते ८ दिवस मेरीचे दर्शन घेण्यास येतात. असे म्हणतात की मेरी नवसाला पावते.
लग्नाआधी आम्ही दोघे देखील ह्या गर्दीत एकदा सामील झालो, दोघांच्या मनात कुठलेही
मेरीकडे मागणे नव्हते तरी देखील मेरीने आपल्या पायथ्याशी राहायची जागा दिली.
आज ४० वर्षे आमची मेरी गावदेवी होऊन बसली आहे व आम्ही न चुकता एवढी वर्षे तिला
वाढदिवसाच्या शुभेच्छां देण्यास चुकलो नाही.




आज आणखी एका आमच्या प्रिय व्यक्तीचा जन्मदिवस, आमच्यासाठी ते देखील देव.आमचे ठाकरे बाबा.( माझी मुले त्यांना ह्या नावाने सम्बोधायची कारण मी त्यांचाबाबा होतो) सज्जन प्रेमळ पापभिरू आत्मा. माझे सासरे.
बाबा, आम्हा सर्वांकडून तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा.


No comments:

Post a Comment

चाफा आणि सोनटक्क्याचेअबोल प्रेम

 मी पाहिलंय ते अबोल प्रेम,    ते देखील दुतर्फी, विचार करा १ नाही तर ५ वर्षे  त्याचे रोज तिच्या बाकावर  नियमितपणे ती यावयाच्या पूर्वीच  हळुवा...