Tuesday, September 11, 2018

आत्मविश्वास









दरड कोसळलीय

वाहतूक खोळम्बलीय
‘कशाला निघतोस आज?
आठवड्याने जा
सर्व काही सुरळीत
पूर्ववत होईल मग जा’
असे दिवसांचे भाकीत
करणार्यांचे कौतुक वाटते
ह्यांना भविष्याची केवढी खात्री
व केवढा विश्वास
आठवड्याने दरड कशावरून
नाही कोसळणार ?
पुढचा आठवडा  
आपण बघणारच ह्याचा
केवढा आत्मविश्वास,
पण काही म्हणा
हा दांडगा आत्मविश्वासच
तुमचे आमचे आयुष्य वाढवितो.
उद्याची सकाळ पाहणारच
ह्या खात्रीने भविष्यातील
स्वप्ने रंगवितो आणि येणाऱ्या दिवसाचे
गणित बिनधास्तपणे मांडतो.





No comments:

Post a Comment

चाफा आणि सोनटक्क्याचेअबोल प्रेम

 मी पाहिलंय ते अबोल प्रेम,    ते देखील दुतर्फी, विचार करा १ नाही तर ५ वर्षे  त्याचे रोज तिच्या बाकावर  नियमितपणे ती यावयाच्या पूर्वीच  हळुवा...