हा रविवार खास बाल मित्रांंचा
एके दिवशी काय झाले
हत्ती हलत डुलत सोंडेचे बिगुल
फुंकत
जंगलात फिरत होता शेपटीने उडवत माशा
लागला झुडुपाला शेपटीचा फटका
जागे झाले झोपलेले डास
अबब केवढी मोठी रक्त पेढी!!!!
झाली डासांची फौज खुश
गुं गुं गुणगुणत केला हल्ला
हत्तीच्या ढुंगणावर
बेसावध हल्ल्याने बावरला हत्ती
बसला मातीत धाड करून
गेले डांस चिरडून
बिगुल सोंडेचे फुंकत
उठला हत्ती पट करून
जंगल हादरले पक्षी उडाले
प्राणीपळाले मात्र
हसता हसता...
हसता हसता...
हत्तीची मुरकुंडी वळली.
Super imagination Ha ha .
ReplyDelete