अनेक वेळा डोक्यात विचार एकाच वेळेस कल्लोळ करतात व वावटळी सारखे डोक्यात फिरत राहतात त्यांचा एकमेकाशी कसलाही मेळ नसतो.अशीच एक वावटळ .
“राजा की आयेगी बारात
मगन मै नाचूंगी...”यह मगन है कौन?
उसे क्यू बताना है?
क्या वो डान्स मास्टर है?
क्या वो दोस्त है?
इन सभी सवालोका जवाब...
सांगेन कधीतरी...
दिसा माजि काहि तरी ते लिहावे
(१८% महाराष्ट्र आजही अशिक्षित आहे त्यांचे काय?)
प्रसंगि अखंडीत वाचीत जावे
व्हा तयार व्हा तयार
सकल खेळ खेळू या
शक्तिवान युंक्तीवान
खेळुनिच होऊया
दुर्बलता तुछ् म्हणोनी
टाकोनिच देऊया
दिसते तसे नसते नसते ते दिसते म्हणून असते असे काही नसते म्हणून जग कशालाही
फसते
मी रिकामा मन रिकामे,
वही रिकामी करायचे आता काय?
काम रिकामे, खिसा रिकामा,
गळणार कसा घाम,
घाम नाही म्हणून छदाम नाही
आता उरलय केवळ रिकामपण,
आहे की नाही रिकामी गम्मत!!
जिच्या हाती पाळण्याची दोरी
ती म्हणे जग सांभाळी
पण...
जिच्या हाती लेंग्याची नाडी,
ती काय सांभाळी...
...संसार!!!
आहे की नाही एक छोटी
पण जीवनाची गम्मत !!
विचित्र पण सत्य स्वजन्माची नोंद
स्वहस्ते व्यवहारात अनेकवेळा करतो
स्वतःच्या मृत्यूची नोंद मात्र आप्तेष्टासाठी
ठेऊन जातो आहे की नाही गम्मत!
No comments:
Post a Comment