आला आला आला,
उन्हाळ्याला
आंघोळ घालीत
धरतीला
सुगंधी मिठीत घेत,
झाडांना, हिरवे लाजवत,
कौलांवर टप टप टप आवाज करीत ,
कडाड,कड,कडाड करीत,
वीजेरी घेऊन काळ्या ढगांना उजाळत ,
दुष्काळाचे सावट ओले करीत
राज्यभर पसरला,
राज्यभर पसरला,
बळीराजाना आनंदवले,
पेरणीच्या तयारीला लावले
चातकाची तहान भागवत,
ढगांच्या तालावर, मोरांना नाचवत,
श्रावणाच्या कोवळ्या उन्हात बागडून,
सणवार सुरु करीत,
आला पाऊस आला!!
No comments:
Post a Comment