वेळ,
ज्याला लागत नाही
ह्याला कधी कोठेही कोणीही प्रवेश
नाकारू शकत नाही,
सांगून ह्याचे येणे
फार क्वचितच, मन मानेल तेव्हां
एकाच वेळेस अनेक जागी
फक्त हाच जाऊ शकतो,
ह्याच्या डायरीचा हिशोब
लागणे कठीण, त्याच्या
मनात आले कि तो हजर,
त्याला अनेक रूपे
कुठले रूप घेऊन
तो समोर कधी उभा ठाकेल
आज पर्यंत कोणी सांगू
शकले,
शकणार,
नाही.
त्याला देश
नाही वेश नाही,
रंग रूप तो ठरवेल तेच
तो आपली भेटीची वेळ स्वतः ठरवितो.
एका लाटेत शेकडो,हजारो, लाखो
तो बासरीवाल्या सारखा
एकाच वेळेस घेऊन जातो.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
काल माझ्या प्रिय मित्राची वेळ
आली व काळाने त्याला नेले.
वयाच्या १७ व्या वर्षी आमची भेट झाली
मैत्री खूप दाट होत गेली. एकमेकाला
रोज भेटल्याशिवाय दिवस सरकत नसे.
कॉलेज संपले मी नोकरीत गुंतलो
तो त्याच्या नोकरीत.
पठ्ठ्या प्रेमात पडला व घाईत
लग्न करून बसला, मग काय
जाणे येणे फारच कमी झाले.
त्याच्या दोन गोंडस मुलांनी मला
काकाचे नाते न जोडता मामाच्या नात्याने जोडले.
ह्या नंतर मात्र आम्ही बरेच दुरावलो तो दिल्लीत
मी बंगळूर असे फिरलो भारत दर्शन करत राहिलो
भेटी गाठी आता फारच दुर्मिळ झाल्या.
त्याने कंटाळून जाहिरात क्षेत्र सोडून दिले
आता तो पेंटिंगस कडे वळला उत्कृष्ट
कला त्याला साथ देत होती अचानक
एक मोठा झटका येऊन त्याची उजवी
बाजू निकामी झाली. पण जिद्द त्याल स्वस्थ
बसू देईना डाव्या हाताने पुन्हा
उजव्या हातावर मात केली व रोज एक
पेंटिंग हा रतीब त्याने ठेवला तो
गेल्या वर्षा पर्यंत मग मात्र प्रकृती
साथ देईनाशी झाली, त्याच्या मूक स्वभावाने
आता पूर्ण मुके रहाण्याचे ठरवले,
माझे जाणे माझ्या व्यापानी बंद झाले
एक मेकाची खुशाली मात्र कळत होती.
नाव मात्र त्याचे होत होते एक उत्ताम
पेंटर म्हणून माझ्या आनंदास तेव्हढे पुरे होते,
२० वर्षे ह्या न त्या आजारांनी त्याला पिछाडले,
शेवटी काल काळाने त्याला नेला.
सुटला.
*ह्या वेड्यावाकड्या विचारांचा खचखोळ वेळोवेळी माझ्या वेड्या समाधानाकरिता कागदावर उतरवीत गेलो. ह्या ना कविता, ना लेख,ना गोष्टी, ना बाल गीते,मनी जसे आले, मेंदूला जसे दिसले तसे वहीत उतरविले,हा प्रयत्न कुठल्याही वांग्मय प्रकारात शोधूनही सापडणार ना मोडणार.माझा हा टाईमपास आवडल्यास तुमचा टाईमपास करण्यास वाचावे.ह्यात शोध/बोध् घेण्यासारखे काहीही नाही,काही असले अथवा दिसले तर ते माझे abstract सेल्फ portrait असे समजावे.