मी ६ वर्षाचा होतो.
वडील भावंडाच्या शेपटीस
पकडून
मी प्राथमिक शाळेत
प्रवेश केला.
शाळा मिशनरी असल्याने छान
टुमदार होती.
२ मजली वास्तू त्यात १ ली
ते ४थि चे वर्ग तळ मजल्यावर
५० मुले बसू शकतील असा
प्रार्थनेची /नाचाची/ वार्षिक कार्यक्रमाची
/पावसाळ्यात खेळायचीमोकळी
जागा.
शाळे समोर दुपारच्या
सुट्टीत खेळण्याची जागा सोडून
भोवती बदाम, चाफा, गोंद अशी झाडे.
मी स्वभावाने बुजरा
(आजही)असल्याने
इतर मुलांशी ओळख करून घेणे,खेळणे
वगैरे मला काही जमले नाही.
बदाम वेचणे ते खाणे हा माझा
छंद.
ओल्या बदामाची तूरट चव मला
आवडायची.
हे बदामाचे झाड मला
खूप आवडायचं,
मोठी मोठी लाल, गुलाबी,
हिरवी पाने
पावसाळ्यात खूप छान
दिसायची.
ह्या बदामाच्या झाडाखाली
उभा राहिलो की
मी सानुली झुळुक व्हायचो
आणि मग विचारू नका
मी (मन) मग पक्षा सारख
आकाशात, माश्या सारखा पाण्यात,
कुठे कुठे भटकायचो,
इथेच स्वप्न बघायची सवय झाली
व सवय कायम राहिली. ह्या
बदामाच्या झाडाने नकळत
मला भविष्याची दिशा
दाखवण्याचा प्रयत्न केला.
माझ्यासाठी खरे तर हे झाड
बोधीवृक्षच होते.
आजही बदामाचे झाड कुठेही दिसले
की
माझ्या अंगात एक प्रकारचा
हुरूप संचारतो.