प्रत्येकाच्या वाट्याची सुख दुखः
सोडली तर येणारे प्रत्येक वर्ष सर्वांचे असेच जाते.
जानेवारी गेला हॅपी हॅपी करण्यात
फेब्रुवारी २८
दिवसांचा म्हणून आंनदीआनंद
मार्च हरवला परिक्षेच्या तयारीत
एप्रिल मात्र फूल फूल करीत गुल झाला
मे घामट खारट पण गावच्या आंब्याने गोड लागला
जून मात्र नवी वह्यापुस्तके भिजवीत झालाओला चिंब
ऑगस्ट स्वातंत्र्याच्या आठवणीत
संपला
सप्टेम्बर बाप्पा मोरया मोरया करीत
‘पुढच्या वर्षी लवकर या’ च्या गजरात लपला
ऑक्टोबर दसरा दिवाळीच्या
झेंडूने सजला पणत्यांनी उजळला
नोव्हेम्बर
मात्र आला तसा गेला
डिसेम्बर नाताळ बाबा बरोबर
आनंदात नाचत गेला
संपले वर्ष पुन्हा एकदा
हॅपी हॅपीच्या गजरात
नव्या जोमाने नवा संकल्प करीत
सुरु झाले नववर्ष
मागील पानावरून पुढे चालू.
मागील पानावरून पुढे चालू.
How true!
ReplyDelete