निवडणुकीचे नारे ऐकू येऊ लागले
चारी दिशांना
घराण्याची गादी
द्या राहुलला, मत द्या मोदीला,
'हेलीकॉपटर' वाध्रा सोबत राहुलने फिरवले.
पडला मोदी सर्वाना भारी, राहुलपप्पूला कोणी ना विचारी
पप्पू धावला दाही दिशांना
समदुखीःसवंगडी जमवाया.
हत्ती मायावती, तृणमूल
बंगाली, अखिलेश समाजवादी
पूर्वेचे, दक्षिणेचे मित्र आले धावून ,
कराया
वध मोदीचा. सज्ज झाहला मर्द मराठा.
पाजी क्रिकेटरने गिरवले धडे
सैराट उंदरासाठी,
भांगडा नाचत दाखवीले, कसे बदलावे बोट थुंकीचे.
शिकूनी त्याचे, पाहून उत आला सिने
कलाकारांना.
केली सुरवात
बिहारी बाबू ने, पांघरून तिरंगा रातो रात ,
पप्पूचे गुण गान गात ,
ऐकून
त्याला, खामोश!!!ओरडे जनता
डफलीच्या तालावर, गात गुण मोदीचे , धरूनि बोट शहाचे
'शी बाई ह्या निळ्याचा वीट आला' म्हणत
'शी बाई ह्या निळ्याचा वीट आला' म्हणत
कवटाळला भगवा डफलीवालीने.
ओरडत राहिला तो पोरका, ‘कुणी
मला दत्तक घेता कां हो दत्तक’
दिल्ली पासून गल्ली पर्यंत
करती नेते फसवणूक मतदात्याची,
कथा न वेगळी आपल्या कणखर महाराष्ट्राची
रस्सीखेच चालू होती भुंग्याची
अन वाघाची
पडले हाताला जसे गठ्ठे, ‘म्हणत
ताकत आपली समान,
एकवटूनी ताकत आपुली , करूया गड सर निवडणुकीचा!
म्हणाला भूल जा दुष्मनी अपनी पुरानी,कर
लेअब यारी
दे मेरा साथ मरोड देंगे कमल
और हाथ.
एकटे राहिले इंजिन बिचारे, धावण्यास
मिळाले नाही निखारे
कळत नव्हते त्यास काय करावे, जशा फुटल्या वाटां,
फुंकत शिटी फिरतोय महाराष्ट्र, बिचारा.
ओरडत , "लाव रे तो विडीओ", ‘मोदी- शहा’ जोडी म्हणजे देशाची नासाडी,
जशी संधी दिली तुम्ही मोदीला,‘द्या एक संधी पप्पूला.
जशी संधी दिली तुम्ही मोदीला,‘द्या एक संधी पप्पूला.
ऐका ताई माई अक्कानो, मतदाते राजानो,
आणा शपथा आमिषे, शिव्या शाप घाला
चुलीत
उमेदवाराना तोला प्रमाणीकतेच्या,
कर्तव्याच्या, तागडीत
राष्ट्र भविष्य आहे फक्त तुमच्या
तर्जनीत.
दवडू नका ही सुवर्ण संधी देश बदलण्याची
मूठ झाकली तुमची लाख मोलाची,
करा विचार ठरवा, कोणास द्यावयाची खुर्ची.