Sunday, December 6, 2020

गेले ते दिन गेले



 घर बसल्या बसल्या

गेले ते दहा महिन्याचे दिवस!

प्रश्न केला मी, माझा मला

खरेच, काय रे केलेस तू?

गोंधळून, मन माझे, विचारात गुंतून गेले !

आठवू लागले दिनक्रम गेल्या दिवसांचा,

 पाउल न पडले

एकही दिवस उम्बरठ्याबाहेर,

मग होतो करत तरी काय?

बसून खिडकी जवळील खुर्चीवर...

 पहात होतो,

ऋतू बदलताना,

 पहात होतो,

उन्हाळ्याला घाम पुसताना  

 पहात होतो

विजेला, काळेभोर ढग कापताना

 पहात होतो

घोंघावणार्या वाऱ्यास,

मुसळधार पावसाशी भांडताना  

 पहात होतो,

विचाराना हातातून चित्र रूपे रेखाटताना

 पहात होतो,

टीवी वर येणारे कोविड१९चे भयाणआकडे

 पहात होतो

रोज, जगभर उडणारा हा:हा:कार,

 पहात होतो

झाकळलेली पहाट होताना

 पहात होतो

अस्वछ दिवस मावळताना,पहात होतो

काळोखी रात्र, दमून झोपताना.

 

होतो वाट पहात

नव्या स्वछ सूर्योदयाची

नव्यां स्वछ श्वासाची

होतो वाट पहात.,

बसून खिडकी जवळील खुर्चीवर...

 

पहाता पहाता वर्षाचा शेवट कि हो आला

राहिले केवळ काही दिवस, वर्ष बदलायला,

२० चे २१ व्हायला,

नव वर्षांच्या आगमनाला...नव्या उमेदीला...

व्हा तयार स्वछ २०२१, च्या स्वागताला!


*ह्या वेड्यावाकड्या विचारांचा खचखोळ वेळोवेळी माझ्या वेड्या समाधानाकरिता कागदावर  उतरवीत गेलो. ह्या ना कविता, ना लेख,ना गोष्टी, ना बाल गीते,मनी जसे आलेमेंदूला जसे दिसले तसे वहीत उतरविले,हा प्रयत्न कुठल्याही वांग्मय प्रकारात शोधूनही सापडणार ना मोडणार.माझा हा टाईमपास आवडल्यास तुमचा टाईमपास करण्यास वाचावे.ह्यात शोध/बोध् घेण्यासारखे काहीही नाही,काही असले अथवा दिसले तर ते माझे abstract सेल्फ portrait असे समजावे.


Tuesday, October 13, 2020

वावटळ -८


 अनेक वेळा डोक्यात विचार एकाच वेळेस कल्लोळ करतात व वावटळी सारखे डोक्यात फिरत राहतात त्यांचा एकमेकाशी कसलाही मेळ नसतो.अशीच एक वावटळ .    


(धो धो कोसळणाऱ्या पावसाकडे

पहात मला पडलेला,एक प्रश्न?)

“नेमेची येतो मग पावसाळा

हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा”   

कवीने ही वाक्य रिम झिम पावसाला

पाहून लिहीली असावीत बहुतकरून.

गावातील नद्या,गुरे, ढोरे,घरे आणि शेते 

पूरात वाहून जाताना पहिले असते 

तर ह्याच कविने काय लिहिले असते?

बाळाला पावसाचे,सृष्टीचे कौतुक कर

असे सांगावेसे वाटले असते का?


बातमी: भारतात कोरोनाचे अगणीत रुग्ण!

थोडक्यात...हाताची घडी तोंडावर... नाही मास्कवर  बोट, 

गुमान घरी बसा आणि राहिलेले दिवस मोजा.

मोजता, मोजता,मोजा निघाला फाटका,

उभे काही रहावेना,पायाला बसला चटका, 

लागली तहान भारी,  प्यायलो वाकून नळाचे पाणी,

टना टन पडली खिशातून नाणी,

शोधून,शोधून थकलो, झाडावर जाऊन बसलो,

पाहून नव्या शेजाऱ्याला  पोपट जोरात हसला

हसता हसता म्हणाला, तुझी चोच कुठाय?

माझ्या चोचीची तुला कशाला  पोच?

बंद कर तुझी वटवट, खा पेरु चट पट

नि जा भुर्रर उडून झट झट .


चौकोन मला आवडत नाही 

सर्व काही असते काटकोनात 

अडकतो आपण चार भिंतीच्या आत,

उठतो, बसतो, बोलतो भांडतो 

कधी कधी श्वास गुदमरतो,

सर्वांगाला फुटतो घाम,

सांगता नाही येणार कधी म्हणू राम! 


माझे काही जात नाही 

जात असते तर दळले  असते 

मग ते कुठल्याही  जातीसाठी असो 

जात, जात , जात !

पाहा भाषेची करामत!!

शब्द एक,पण अर्थ मात्र ३ !!


*ह्या वेड्यावाकड्या विचारांचा खचखोळ वेळोवेळी माझ्या वेड्या समाधानाकरिता कागदावर  उतरवीत गेलो. ह्या ना कविता, ना लेख,ना गोष्टी, ना बाल गीते,मनी जसे आलेमेंदूला जसे दिसले तसे वहीत उतरविले,हा प्रयत्न कुठल्याही वांग्मय प्रकारात शोधूनही सापडणार ना मोडणार.माझा हा टाईमपास आवडल्यास तुमचा टाईमपास करण्यास वाचावे.ह्यात शोध/बोध् घेण्यासारखे काहीही नाही,काही असले अथवा दिसले तर ते माझे abstract सेल्फ portrait असे समजावे.


 

 

 

 

 

  

  

 

 

Tuesday, October 6, 2020

"सिनेनटाच्या मरणाचे गूढ!"

एक नाही दोन नाही

तब्बल १४० दिवस!


टी  वी च्यानेल्सची

रोज उठून बोंबाबोंब

विषय मात्र एकच,  

"सिनेनटाच्या मरणाचे गूढ!"

 दिवस रात्रौ करून घसाफोड 

जमवले ना हो ह्यांनी वर्षाचे राशन! 

आत्महत्या!

कि 

हत्या!

आत्महत्या!

कि 

हत्या! 

आत्महत्या!

कि 

हत्या!

थांबवा ही बोंबा बोंब 

तुमच्यां ह्या आरडा ओरर्डीने

 जागा होईल गेलेला  

त्यालाच विचारा

"कायरे तुझी हत्या केली ? 

कि केलीस तू  आत्महत्या? 

तोच सांगू शकेल 

सत्यकथा!!!

 

Thursday, September 24, 2020

गेले ते दिन गेले


 

गेले  ते दिन गेले (घालवले)

 (मार्च ते ऑगस्ट)

 

घर बसल्या बसल्या

गेले ते १५० दिवस!

प्रश्न केला मी मनासं  

खरेच, काय रे केलेस तू?

गोंधळून, मन माझे, विचारात ,गुंतून गेले !

आठवू लागले दिनक्रम गेल्या दिवसांचा,

महामारीने अचानक जगाला 

घातलेला विळखा आणि 

उडालेल्या  हा:हा: काराचा.  


पाउल न पडले

एकही दिवस उम्बरठ्याबाहेर

मग करत होतो तरी काय?

खिडकी जवळील खुर्चीवर बसून...

पहात होतो

मदाऱ्यास, जनतेस नाचवताना

पहात होतो 

महामारी कोविड  वरील  उपाय

पहात होतो    

जनतेला मेणबत्या पेटवताना 

पहात होतो 

थाळ्या बडवताना 

पहात होतो

राष्ट्र, देश, जग बिथरथाना  

दिवसें दिवस जनतेत वाढणारी भीती

पहात होतो

कोविड महामारी वरील उपाय शोधण्याची धावपळ 


पहात होतो

ऋतू बदलताना,

पहात होतो

उन्हाळ्याला घाम पुसताना  

पहात होतो

विजेला, काळेभोर ढग कापताना

पहात होतो

घोंघावणार्या वाऱ्यास,

मुसळधार पावसाशी भांडताना  

पहात होतो,

टीवी वर येणारे कोविड १९ चे भयाणआकडे

पहात होतो

रोज, जगभर उडणारा हा:हा:कार,

पहात होतो

झाकळलेली उदास पहाट 

पहात होतो

मरगळलेला  दिवस मावळताना,

पहात होतो

भयाण काळोखी रात्र, 

दमून झोपताना.


पहात होतो,

माझ्यां विचाराना हातातून 

चित्र रूपे उतरताना 



आता मात्र पहातोय वाट

नव्या स्वछ सूर्योदयाची

नव्यां स्वछ श्वासाची

पहातोय वाट... 

कोरोनाचा नायनाट होण्याची!


बसून खिडकी जवळील खुर्चीवर...






 

 


 

 


Monday, September 7, 2020

 ३६५ दिवस  गेले उडून भुर्रकन.

८ सप्टेंबर, 

मत माउलीचा जन्मदिवस.

तिच्या वाढदिवसाच्या निमिताने येथे ७ दिवस 
जत्रा भरते. 
यंदा जत्ना नाही आणि लाडक्या देवीचे दर्शन देखील होणार नाही. ४२ वर्षाचा दर्शनाचा शिरस्ता मोडणार.तिच्या पाय्थ्याशी आमची ४२ वर्षे गेली. 
या वर्षी माउली तुला पाय्थ्यावरून नमस्कार. 
जगभरात पसरलेल्या महामारीस आता थांबव हीच तुझ्या चरणी प्रार्थना, 

मत माऊलीस वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.
आणि आमच्या ठाकरे बाबाना देखील वाढ दिवसाच्या शुभेच्छा .



Friday, August 21, 2020

सारे कसे शांत शांत!

 

सारे कसे शांत शांत!

तसे काही घडत नव्हते
दिवस उजाडत होता
दुपार शांत
संध्याकाळ शांत
रात्र काळोखात शांतपणे लपत होती
उन्हाळा तापवून शांतपणे निघून गेला
पावसाळ्याने मात्र महाराष्ट्राला
नाकी नऊ आणले.

एका छोट्याशाकोरोनाव्हायरसने
विश्व हलवून सोडले होते,

परमेश्वरांनी मात्र शांतता पाळण्याचे
संदेश कोरोना’ करवी दिले होते
कृष्ण जन्म,दही कालां देखील  यंदा 
शांतेत पार पडला ना गाजा ना बाजा  

 भक्तीचे ओंगळ प्रदर्शन,
भ्रष्टाचार विभ्त्सपणा'थांबावा
म्हणून खऱ्या भक्तांना घरीच भेट 
देण्याचे देवानी ठरविले असावे. 

 ‘श्री गजानना’ उद्या तुमचे आगमन
देखील घरा घरात शांतपणे होईल.
सार्वजनिक स्थापनेचा गोंधळ बंद 

आपण सुरु केलेल्या रिवाजाचे 
झालेले भयाण स्वरूप यंदा नाही हे पाहून
आपल्या १०० व्या पुण्य तिथीस
लोकमान्य  देखील खुशीत  असतील 
  


अनंत चतुर्थीच्या दिवशी
ना मिरवणुका ना गर्दी
बाप्पाला,जड अंतकरणाने भक्त 
मनातल्या मनात निरोप देतील.

“गणपतीबाप्पा मोरया
पुढच्यावर्षी लवकर या”
ह्या गर्जना देखील
कानगोष्टी प्रमाणे ऐकू येतील.

...पुन्हा
सारे कसे शांत शांत!

 मी मात्र...

तुमचे प्रार्थनेने स्वागत करतो ...

वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ 
निर्विघ्न कुरुमेव देवो सर्वकार्येषु सर्वदा.

' गणपती बाप्पा मोरया !!!
पुढच्या वर्षी लवकर या!

कोरोना कधी जाणार
हे केवळ बाप्पास ठाऊक.

Saturday, July 4, 2020

गुरुत्वाकर्षण’= ‘गुरु पोर्णिमा’

गुरु पौर्णिमा 

इयता ५ वीत न्यूटनच्या ‘गुरुत्वाकर्षण’ शोध आणि  ‘गुरुपोर्णिमा’ह्यात विशेष फरक  नाही हे मत मी मनोमनी  पक्के केले होते.  त्याच वेळेस मराठी व्याकरणात शब्दाची संधी फोड शिकत होतो. 

गुरुत्वाकर्षण’= गुरु + त्वा (तूझे ) + आकर्षण 

म्हणजेच :

ज्या व्यक्तीस आपण ज्ञान देणारा’ मानतो त्याच्या कडे आपण आकर्षित झालेलो असतो. म्हणजेच

‘गुरुत्वाकर्षण’= ‘गुरु पोर्णिमा’ हे  समीकरण माझ्या बालमना (?) पासून  ते आजतागायत रुतले आहे.

असो.

त्याच लहान शाळेतून मोठ्या  शाळेत (ईयता ७वी) गेलो तेव्हा वर्गात पुनर्वसन केलेल्या मुलांच्या होणाऱ्या 

सवांदावरून  “चांदोरकर बाई’ म्हणजे ‘गुरूत्वाकर्षण.’मेंदू थोडा गोंधळला अर्थ खरा कोणता न्यूटन की बाई?

म्हणजेच चांगल्या शिकवणाऱ्या (?) समजावणाऱ्या शिक्षकाविषयी वाटणारे आकर्षण 


कसे काय?

ह्याचे उत्तर मी स्वतःस दिले की जो गुरु गुरुपोर्णीमेस आठवत नाही ते गुरूत्वाकर्षण नव्हे.नोकरीत देखील आपला 

वरिष्ठ हा आपला गुरु, हा समज मात्र एकलव्या प्रमाणे दुरूनच अनुभवले.

आपल्याला आयुष्याचे मार्गदर्शन करणारा गुरु शोधायला हवा हे मनाशी पक्के केले पण ह्या गुरूला शोधावयाचे कुठे?  हे काही समजेना ‘वेळ येईल तेव्हा बघू’ अशी स्वतः ची समजूत काढली. जसा कामातून मोकळा झालो तेव्हां 

पुन्हा ‘गुरु’ शिवाय मोक्ष नाही असे बऱ्याचदा कानावर पडू लागले.

काही बोधप्राय  वाचनात देखील आली, जसे.

गुरु एक असे तेज आहे ज्यांनी मनातील संशयरूपी अंधःकार कुठल्याकुठे पळून जातो.

गुरु म्हणजे असे ज्ञान: की ज्याची प्राप्ती झाल्याबरोबर मनातील भयाची सगळी भावनाच लोप पावते. 

गुरु ही एक अशी दीक्षा आहे: की ज्याला गुरुदीक्षा प्राप्त झाली तो हा भवसागर तरून गेलाच म्हणून समजा. 

गुरु ही एक अशी नदी आहे: जी सतत आपल्या प्राणांतून वाहत असते. 

गुरु म्हणजे असा सत् चित् आनंद आहे: जो आम्हाला आमची खरी ओळख करून देतो. 

गुरु म्हणजे एक बासरी आहे : जिच्या नुसत्या मंजुळ आवाजानेच आपले मन आणि 

शरीर आत्मानंदात मग्न होऊनजाते.

गुरु म्हणजे केवळ अमृतच: ह्या अमृताच्या सेवनाने तहान कायमची आणि पूर्णपणे शमते. 

गुरु म्हणजे एक अशी कृपाच: असते जी केवळ कांही भाग्यवान आणि सत्पात्री शिष्यांनाच प्राप्त होते आणि 

काहींना अशी कृपा मिळूनही ती मिळालेली त्यांना समजत नाही.

गुरु कुबेराचा अक्षय्य पात्र आहे: त्या खजिन्याचे मोल होऊच शकत नाही.

गुरू म्हणजे एक प्रसाद आहे: ज्याच्या भाग्यात असेल त्याला कांहीच मागण्याची इच्छा उरत नाही. 

असे बरेच कानावरून गेले आणि मी चांगलाच संभ्रमात पडलो

कारण...

आतापर्यंत झालेले महात्मे संत ज्ञानेश्वर, तुकाराम, तसेच साई बाबा,शेगावचे गजानन  महाराज, अक्कल कोटचे 

स्वामी समर्थ, ह्यांना देखील माझा नमस्कार एक अद्भुत शक्ती म्हणूनच नम्रपणे होतो.

अंध श्रद्धेचा फायदा घेणारे आसाराम बापू सारखे अनेक गुरु वावरताना पाहून ‘गुरु’हा केवळ 

शब्द असावा असे वाटू लागते.

अजूनही गुरु भेटेल हि आशा मात्र आहे ज्या दिवशी मला 'गुरु' लाभेल त्या दिवशी  ‘गुरूत्वाकर्षण.’ चा अर्थ 

समजेल अशी अशा बाळगून आहे.

गुरुपोर्सणिमे निमित्, सर्व गुरुजनाना समर्पित.

 

 

*ह्या वेड्यावाकड्या विचारांचा खचखोळ वेळोवेळी माझ्या वेड्या समाधानाकरिता कागदावर  उतरवीत गेलो. ह्या ना कविता, ना लेख,ना गोष्टी, ना बाल गीते,मनी जसे आलेमेंदूला जसे दिसले तसे वहीत उतरविले,हा प्रयत्न कुठल्याही वांग्मय प्रकारात शोधूनही सापडणार ना मोडणार.माझा हा टाईमपास आवडल्यास तुमचा टाईमपास करण्यास वाचावे.ह्यात शोध/बोध् घेण्यासारखे काहीही नाही,काही असले अथवा दिसले तर ते माझे abstract सेल्फ portrait असे समजावे.

 


चाफा आणि सोनटक्क्याचेअबोल प्रेम

 मी पाहिलंय ते अबोल प्रेम,    ते देखील दुतर्फी, विचार करा १ नाही तर ५ वर्षे  त्याचे रोज तिच्या बाकावर  नियमितपणे ती यावयाच्या पूर्वीच  हळुवा...