घर बसल्या बसल्या
गेले ते दहा महिन्याचे दिवस!
प्रश्न केला मी, माझा
मला
खरेच, काय रे
केलेस तू?
गोंधळून, मन माझे,
विचारात गुंतून गेले !
आठवू लागले दिनक्रम
गेल्या दिवसांचा,
पाउल न पडले
एकही दिवस उम्बरठ्याबाहेर,
मग होतो करत तरी काय?
बसून खिडकी जवळील
खुर्चीवर...
पहात होतो,
ऋतू बदलताना,
पहात होतो,
उन्हाळ्याला घाम
पुसताना
पहात होतो
विजेला, काळेभोर ढग
कापताना
पहात होतो
घोंघावणार्या वाऱ्यास,
मुसळधार पावसाशी भांडताना
पहात होतो,
विचाराना हातातून
चित्र रूपे रेखाटताना
पहात होतो,
टीवी वर येणारे कोविड१९चे
भयाणआकडे
पहात होतो
रोज, जगभर उडणारा
हा:हा:कार,
पहात होतो
झाकळलेली पहाट होताना
पहात होतो
अस्वछ दिवस मावळताना,पहात होतो
काळोखी रात्र, दमून
झोपताना.
होतो वाट पहात
नव्या स्वछ
सूर्योदयाची
नव्यां स्वछ
श्वासाची
होतो वाट पहात.,
बसून खिडकी जवळील
खुर्चीवर...
पहाता पहाता
वर्षाचा शेवट कि हो आला
राहिले केवळ काही दिवस, वर्ष बदलायला,
२० चे २१ व्हायला,
नव वर्षांच्या आगमनाला...नव्या
उमेदीला...
व्हा तयार स्वछ २०२१,
च्या स्वागताला!
*ह्या वेड्यावाकड्या विचारांचा खचखोळ वेळोवेळी माझ्या वेड्या समाधानाकरिता कागदावर उतरवीत गेलो. ह्या ना कविता, ना लेख,ना गोष्टी, ना बाल गीते,मनी जसे आले, मेंदूला जसे दिसले तसे वहीत उतरविले,हा प्रयत्न कुठल्याही वांग्मय प्रकारात शोधूनही सापडणार ना मोडणार.माझा हा टाईमपास आवडल्यास तुमचा टाईमपास करण्यास वाचावे.ह्यात शोध/बोध् घेण्यासारखे काहीही नाही,काही असले अथवा दिसले तर ते माझे abstract सेल्फ portrait असे समजावे.
No comments:
Post a Comment