एक नाही दोन नाही
तब्बल १४० दिवस!
टी वी च्यानेल्सची
रोज उठून बोंबाबोंब
विषय मात्र एकच,
"सिनेनटाच्या मरणाचे गूढ!"
दिवस रात्रौ करून घसाफोड
जमवले ना हो ह्यांनी वर्षाचे राशन!
आत्महत्या!
कि
हत्या!
आत्महत्या!
कि
हत्या!
आत्महत्या!
कि
हत्या!
थांबवा ही बोंबा बोंब
तुमच्यां ह्या आरडा ओरर्डीने
जागा होईल गेलेला
त्यालाच विचारा
"कायरे तुझी हत्या केली ?
कि केलीस तू आत्महत्या?
तोच सांगू शकेल
सत्यकथा!!!
No comments:
Post a Comment