इयता ५ वीत न्यूटनच्या ‘गुरुत्वाकर्षण’ शोध आणि ‘गुरुपोर्णिमा’ह्यात विशेष फरक नाही हे मत मी मनोमनी पक्के केले होते. त्याच वेळेस मराठी व्याकरणात शब्दाची संधी फोड शिकत होतो.
गुरुत्वाकर्षण’= गुरु + त्वा (तूझे ) + आकर्षण
म्हणजेच :
ज्या व्यक्तीस आपण ज्ञान देणारा’ मानतो त्याच्या कडे आपण आकर्षित झालेलो असतो. म्हणजेच
‘गुरुत्वाकर्षण’= ‘गुरु पोर्णिमा’ हे समीकरण माझ्या बालमना (?) पासून ते आजतागायत रुतले आहे.
असो.
त्याच लहान शाळेतून मोठ्या शाळेत (ईयता ७वी) गेलो तेव्हा वर्गात पुनर्वसन केलेल्या मुलांच्या होणाऱ्या
सवांदावरून “चांदोरकर बाई’ म्हणजे ‘गुरूत्वाकर्षण.’मेंदू थोडा गोंधळला अर्थ खरा कोणता न्यूटन की बाई?
म्हणजेच चांगल्या शिकवणाऱ्या (?) समजावणाऱ्या शिक्षकाविषयी वाटणारे आकर्षण
कसे
काय?
ह्याचे उत्तर मी स्वतःस दिले की जो गुरु गुरुपोर्णीमेस आठवत नाही ते गुरूत्वाकर्षण नव्हे.नोकरीत देखील आपला
वरिष्ठ हा आपला गुरु, हा समज मात्र एकलव्या प्रमाणे दुरूनच अनुभवले.
आपल्याला आयुष्याचे मार्गदर्शन करणारा गुरु शोधायला हवा हे मनाशी पक्के केले पण ह्या गुरूला शोधावयाचे कुठे? हे काही समजेना ‘वेळ येईल तेव्हा बघू’ अशी स्वतः ची समजूत काढली. जसा कामातून मोकळा झालो तेव्हां
पुन्हा ‘गुरु’ शिवाय मोक्ष नाही असे बऱ्याचदा कानावर पडू लागले.
काही बोधप्राय वाचनात देखील आली, जसे.
गुरु म्हणजे एक बासरी आहे : जिच्या नुसत्या मंजुळ आवाजानेच आपले मन आणि
गुरु म्हणजे एक अशी कृपाच: असते जी केवळ कांही भाग्यवान आणि सत्पात्री शिष्यांनाच प्राप्त होते आणि
गुरु कुबेराचा अक्षय्य पात्र आहे: त्या खजिन्याचे मोल होऊच शकत नाही.
गुरू म्हणजे एक प्रसाद आहे: ज्याच्या भाग्यात असेल त्याला कांहीच मागण्याची इच्छा उरत नाही.
असे बरेच कानावरून गेले आणि मी चांगलाच संभ्रमात
पडलो
कारण...
आतापर्यंत झालेले महात्मे संत ज्ञानेश्वर, तुकाराम, तसेच साई बाबा,शेगावचे गजानन महाराज, अक्कल कोटचे
स्वामी समर्थ, ह्यांना देखील माझा नमस्कार एक अद्भुत शक्ती म्हणूनच नम्रपणे होतो.
अंध श्रद्धेचा फायदा घेणारे आसाराम बापू सारखे अनेक गुरु वावरताना पाहून ‘गुरु’हा केवळ
शब्द असावा असे वाटू लागते.
अजूनही गुरु भेटेल हि आशा मात्र आहे ज्या दिवशी मला 'गुरु' लाभेल त्या दिवशी ‘गुरूत्वाकर्षण.’ चा अर्थ
समजेल अशी अशा बाळगून आहे.
गुरुपोर्सणिमे निमित्, सर्व गुरुजनाना समर्पित.
*ह्या वेड्यावाकड्या विचारांचा खचखोळ वेळोवेळी माझ्या वेड्या समाधानाकरिता कागदावर उतरवीत गेलो. ह्या ना कविता, ना लेख,ना गोष्टी, ना बाल गीते,मनी जसे आले, मेंदूला जसे दिसले तसे वहीत उतरविले,हा प्रयत्न कुठल्याही वांग्मय प्रकारात शोधूनही सापडणार ना मोडणार.माझा हा टाईमपास आवडल्यास तुमचा टाईमपास करण्यास वाचावे.ह्यात शोध/बोध् घेण्यासारखे काहीही नाही,काही असले अथवा दिसले तर ते माझे abstract सेल्फ portrait असे समजावे.