गेले ते दिन गेले (घालवले)
(मार्च ते ऑगस्ट)
घर बसल्या बसल्या
गेले ते १५० दिवस!
प्रश्न केला मी मनासं
खरेच, काय रे
केलेस तू?
गोंधळून, मन माझे,
विचारात ,गुंतून गेले !
आठवू लागले दिनक्रम
गेल्या दिवसांचा,
महामारीने अचानक जगाला
घातलेला विळखा आणि
उडालेल्या हा:हा: काराचा.
पाउल न पडले
एकही दिवस उम्बरठ्याबाहेर
मग करत होतो तरी काय?
खिडकी जवळील खुर्चीवर बसून...
मदाऱ्यास, जनतेस नाचवताना
पहात होतो
महामारी कोविड वरील उपाय
पहात होतो
जनतेला मेणबत्या पेटवताना
पहात होतो
थाळ्या बडवताना
पहात होतो
राष्ट्र, देश, जग बिथरथाना
दिवसें दिवस जनतेत वाढणारी भीती
पहात होतो
कोविड महामारी वरील उपाय शोधण्याची धावपळ
पहात होतो
ऋतू बदलताना,
पहात होतो
उन्हाळ्याला घाम
पुसताना
पहात होतो
विजेला, काळेभोर ढग
कापताना
पहात होतो
घोंघावणार्या वाऱ्यास,
मुसळधार पावसाशी भांडताना
पहात होतो,
टीवी वर येणारे कोविड १९ चे
भयाणआकडे
पहात होतो
रोज, जगभर उडणारा
हा:हा:कार,
पहात होतो
झाकळलेली उदास पहाट
पहात होतो
मरगळलेला दिवस
मावळताना,
पहात होतो
भयाण काळोखी रात्र,
दमून झोपताना.
पहात होतो,
माझ्यां विचाराना हातातून
चित्र रूपे उतरताना
आता मात्र पहातोय वाट
नव्या स्वछ
सूर्योदयाची
नव्यां स्वछ
श्वासाची
पहातोय वाट...
कोरोनाचा नायनाट होण्याची!
बसून खिडकी जवळील खुर्चीवर...