अगणीत तारांगणाखाली,
ओहोटीच्या लाटांच्या
अस्पष्ट गुणगुणगुण्यात
माझी पाऊले हरवली होती
शोधीत आठवणीच्या गुंत्यातून
ती पुसलेली आठवण.
भरकटलेले मन वाटले
स्वतःशी करावेसे मोकळे,
तेव्हां शोधीत एकांताला
पाऊले वळाली स्मशानाकडे
प्राजक्ताच्या फुलांप्रमाणे
मी तुझ्या आठवणीना,
साक्षिला ठेवुनी तारकांमध्ये
हरवलेल्या त्या चंद्राला!
क्षण भंगुर जीवनाला,
लाभली झालर शांततेची
भासली उणीव केवळ,
तुझ्या श्वासाची करण्यास,
भंग त्या शांततेला