आई
तुला हरवून होतील आज १८ वर्षे,
तुझ्या वाढदिवशी, तुझ्या आठवणी
येतात दाटून लहानपणीच्या.
कोणकोणत्या म्हणून लिहू,
कधी ना दिसली
तुझ्या कपाळावर आठी,
कधी ना तू वटारलेस डोळे,
ना रागावलीस कधी आम्हा,
ना उचललास धपाट्यांसाठी हात.
७ जणांचे ७ चोचले,पुरविलेस तू,
कपाळावर कधी ना आली आठी
रांधा,वाढा, उष्टी काढा ह्यात रमलीस
नाही कंटाळलीस कधी.
आपुल्या आजाराचे गुपित लपवूनी
सेवा करीत, बरे केलेस आमुचे आजार.
रात्र असो वा दिवस तू सेवेस मात्र हजर
तक्रार तुझी ऐकली न कधी.
आम्ही न केला तुझा जन्मदिवस,साजरा
ना दिली कधी तुला भेट.
रुसलीस आम्हावरी, दिलेस केवळ प्रेम.
कठीण प्रसंगी, सदैव राहिलीस उभी,
बनून आमुची दीपस्तंभ,
आज या तुझ्या जन्मदिनी,
आज तुझया ह्या जन्मदिनी
आम्हा सर्वांची हि स्वीकार छोटीशी भेट.