Saturday, November 27, 2021

श्रद्धांजली

 श्रद्धांजली


माझ्या लहानपणापासून मी (आम्ही) सर्व भावंडे 

सकाळच्या येणाऱ्या सर्व वर्तमान पत्रे आपापल्या 

सोयीनुसार वाचत  असू,  दोन मराठी एक इंग्रजी 

व दुपारी/ संध्कायाळी  एक इंग्रजी वर्तमान पत्र.

ह्या सवयी मुळे आज हि आम्हा सर्व भावंडाकडे 

वर्तमान पत्र हातात घेऊन चाळल्याशिवाय 

दिवस सुरु होत नाही.वाचनाचे हे बाळकडू कधीच 

कडू लागले नाही., 

वर्तमान पत्रे हातात आल्यावर माझी सवय म्हणजे

पहिल्या पानावरील मथळा वाचून, मी शेवटच्या पाना पासून 

पेपर उलटा वाचत असतो कारण खेळांची बातमी

महत्वाची वाटते. राज कारणा पेक्षा त्यात रस जास्त

खेळ मी खेळत असे किंवा नसे पण सर्व खेळात मध्ये रुची .

बुद्बिबळ, ब्याडमिनटन, बिलीयर्ड्स, टेनिस, हुतुतू, क्रिकेट,

 खेळाच्या बातम्या वाचल्या कि माझे पोट भरायचे,

मग एक एक पान उलटत नजर फिरवीत जगाच्या बातम्या 

आत्मसात करत मी थांबायचो तो, त्या ओबिचुरी पानावर 

ज्यावर व्यक्तीच्या छाया  चित्राबरोबर असलेल्या  

शाब्दिक श्रद्धांजली  वाचण्यात मला आजही रस आहे.

त्या छोट्या चार ओळीमध्ये गेलेल्या व्यक्तीचे कर्तृत्व,

स्वभाव, लोकप्रियता बरेच  काही सामावलेले असते  

पुन्हा वर्षाने  जेव्हां त्या व्यक्तीस ह्याच पानावर 

पहातो तेंव्हा आपल्या ओळखीचे कोणी गेल्या सारखे 

वाटू लागते. 

आजही माझा हा नित्यनेम चुकला नाही.

प्रत्येक छाया चित्र न्याहाळून पहाणे चुकत  नाही

 माझ्या ओळखीचे जरी  नसले तरी  मेंदूत गरगर 

चक्र फिरते व मी त्या सर्वांमधील लक्षात रहाणाऱ्या

चेहऱ्यापाशी थांबतो व त्याच्या जीवनात काय काय घडले असेल 

ह्याचा तर्क बांधतो छायाचित्राखालील श्रद्धांजली  वाचून 

त्याच्या प्रियजना बद्दल उगाचच विचार करतो. 

दिवस भर  कुठेतरी मेंदूत हा विषय अडकलेला असतो.

हे सर्व नातेवाईक कशासाठी प्रिय व्यक्ती गेल्यावर  

वर्षो न वर्ष कशाकरिता हे जाहीर दुखःप्रदर्शन करतात.

जनतेच्या माहिती  करिता कि गेलेल्या व्यक्तीची बातमी 

न मिळालेल्या मित्र परिवारास  व आप्तेष्टाना कळविण्यास? 

कि त्या व्यक्तीस मोक्ष  मिळावा म्हणून? की शिरगणतीवाल्यांना कळावे 

म्हणून? एक ना अनेक प्रश्न.पण हा आठ्वणीचा  

दिवस उलटल्यावर जवळचे कदाचित कात्रण जपत असतील, 

पण देशभर गेलेल्या वर्तमानपत्रांच्या  आवृतींचे काय? 

ह्याचा विचारही  करणे कठीण.


काल २६/११ /२००८ च्या ताज आतंकवादि हल्ल्यात 

नाहक बळी पडलेल्या व  आतंकवादिंशी जिगरीने दोन हात करणाऱ्या

आपल्या पोलीस दलास मनपूर्वक श्रधांजली 


*ह्या वेड्यावाकड्या विचारांचा खचखोळ वेळोवेळी माझ्या वेड्या समाधानाकरिता कागदावर  उतरवीत गेलो. ह्या ना कविता, ना लेख,ना गोष्टी, ना बाल गीते,मनी जसे आलेमेंदूला जसे दिसले तसे वहीत उतरविले,हा प्रयत्न कुठल्याही वांग्मय प्रकारात शोधूनही सापडणार ना मोडणार.माझा हा टाईमपास आवडल्यास तुमचा टाईमपास करण्यास वाचावे.ह्यात शोध/बोध् घेण्यासारखे काहीही नाही,काही असले अथवा दिसले तर ते माझे abstract सेल्फ portrait असे समजावे.






 





Wednesday, November 17, 2021

दिपावली

 दिपावली - आली-गेली 


दूर करोनी,  सावट करोना भीतीचे. 

तुमची, माझी, आपली 

आली, आली,आली, यंदा बार उडवीत आली,

 

हसत, खुशीत, आनंदात, आली वाजत गाजत !

झगमग झगमग   झगमगाट पणत्यांचा,

दारोदारी पसरीत गालिचे रांगोळ्याचे !


ऐका गम्मत आमुच्या  घरची,

वर्शो न वर्षे न बदलले काही  

मिट्ट काळोखी डोळे चोळीत 

स्वागत करती भाव गीतांनी  पहाटेचे 


तेल उटणे लाउनी केली तयारी अभ्यंग स्नानाची

लहाना पासून मोठ्या पर्यंत 

झाली सज्ज, 

नटुनी तयार,घाई फराळ खाण्यासी


 लाडू, चकली, करंजी, 

अनारसे आणि चिरोटे, 

आईने, सजवली  फराळ ताटे,

सरसावून हात मारीती सारे  फराळावरी. 


आजीने उजवल्या पणत्या  अंगणात,

केले वाटप बाबांनी फुलबाजा,अनाराचे, 

 प्रसन्न होई मन पाहुनी, कारंजे, फुलबाजे फुलताना, 

 पाहून भुई चक्राला, सर सर  फिरताना वाटे, 

असेच असावे, चक्र सुदर्शन त्या गिरीधराचे. 

आली मावशी आली आत्या, 

पाहून मामा मामीला,

फुलली कळी आजीची, 

पाहिले तीस मी पदराने,

डोळे  हळूच टिपताना

गजबजले घर, अंगण, गप्पा शप्पाने . 

आली दिपावली घेउनी ४ दिवस 

कौटुंबिक जिव्हाळ्याचे,

ना समजले न उमजले 

कधी  गेले ४ दिवस मजेचे


हिरमुसली आजी एकली विचाराने 

 पाहीन का मी हा आनंद येत्या वर्षी 

 भरल्या डोळ्यांनी. 


जमलेले कुटुंब हळू हळू विखुरले

घर गजबजलेले, आता शांत झाले,

आली आली गेलीगेली दिपावली, 

आनंद पसरून.


*ह्या वेड्यावाकड्या विचारांचा खचखोळ वेळोवेळी माझ्या वेड्या समाधानाकरिता कागदावर  उतरवीत गेलो. ह्या ना कविता, ना लेख,ना गोष्टी, ना बाल गीते,मनी जसे आलेमेंदूला जसे दिसले तसे वहीत उतरविले,हा प्रयत्न कुठल्याही वांग्मय प्रकारात शोधूनही सापडणार ना मोडणार.माझा हा टाईमपास आवडल्यास तुमचा टाईमपास करण्यास वाचावे.ह्यात शोध/बोध् घेण्यासारखे काहीही नाही,काही असले अथवा दिसले तर ते माझे abstract सेल्फ portrait असे समजावे.



 

    

  

 



  


Tuesday, November 2, 2021

पुन्हा एकदा दुसरी पाटी-

 



पुन्हा एकदा दुसरी पाटी-


आज माझ्या ह्या पाटीला १ वर्ष ११ महीने होत आलेत.

मी आजही या पाटीवरनित्य नेमाने १ चित्र काढतो,

माझ्या चित्रांचा आनंद मीच घेतो, इतराना देण्याचा 

प्रयत्न instagram  वर टाकून गेले वर्षभर करत होतो.


पण काही दिवसांपूर्वी लक्षात आले कि तुम्ही

जरी शेणाचा फोटो टाकलात तरी तुम्हाला 

१००० लाइकस मिळतात. 

ह्या instagram वर संचार करणार्यांचे हृदय प्रेमळ, 

कुणालाही दुखावणे ह्यांना आवडत नाही.

काही काय बरेचसे महाभाग आपला फोटो 

रोज टाकत असतात त्यांची मला गम्मत वाटते 

एका रात्रीत होणारा बदल तेच जाणो 

तरी देखील रोज ह्या पठ्यानां  १००० लाइकस मिळतातच.

पण माझ्या सारख्या बर्याच चित्रकारांना १० लाइकस

मिळाले तरी आम्ही खुश.

पण यंदा अनंत चतुर्दशी पर्यत श्री गणेशाची १० चित्रे 

टाकून instagram ला रामराम ठोकला.

झालेल्या कौतुकावर खुश रहावयाचा 

निर्णय घेतला.  रोज चित्र काढावयाचा 

रतीब मात्र आजही चालू आहे.

चित्रकाराला त्याच्या स्वत:च्या कलेत 

मिळणारा आनंद हा इतराना सांगूनही 

समजणार नाही. 

ईश्वराकडे एकच मागणे, लय नाही देवा 

जर मनुष्य जन्मास पुन्हा घातलेस तर 

मला चित्रकारचाच  जन्म दे. 




आज लक्ष्मीपूजन.

 हि दिपवाळी आपणास  भरभराट आणो. 



*ह्या वेड्यावाकड्या विचारांचा खचखोळ वेळोवेळी माझ्या वेड्या समाधानाकरिता कागदावर  उतरवीत गेलो. ह्या ना कविता, ना लेख,ना गोष्टी, ना बाल गीते,मनी जसे आलेमेंदूला जसे दिसले तसे वहीत उतरविले,हा प्रयत्न कुठल्याही वांग्मय प्रकारात शोधूनही सापडणार ना मोडणार.माझा हा टाईमपास आवडल्यास तुमचा टाईमपास करण्यास वाचावे.ह्यात शोध/बोध् घेण्यासारखे काहीही नाही,काही असले अथवा दिसले तर ते माझे abstract सेल्फ portrait असे समजावे.




 


चाफा आणि सोनटक्क्याचेअबोल प्रेम

 मी पाहिलंय ते अबोल प्रेम,    ते देखील दुतर्फी, विचार करा १ नाही तर ५ वर्षे  त्याचे रोज तिच्या बाकावर  नियमितपणे ती यावयाच्या पूर्वीच  हळुवा...