मी इयत्ता तिसरीत असेन त्तेव्हा तिचा आवाज मी प्रथम ऐकला
आणि तिथेच माझा छोटासा कलिजा खल्लास झाला
ते देखील ती बाला नजरेस न पडता !
गाणे होते " ऐ मेरे दिल कही और चल" (दाग)
त्यानंतर मी तुझा, तुझ्या आवाजाचा वेडा झालो
तो आज तागयात वेडाच राहिलो व मरेपर्यंत वेडा राहीन.
ह्या गाण्या पाठोपाठ माझ्या ओठावर चिकटलेले शहारे आणणारे गाणे म्हणजे
"आयेगा आनेवाला..."(महल). आठवड्यातून एकदा तरी शिट्टी वर न कळत वाजले जाते .
" एका तळ्यात होती ... हे भाव गीत ऐकले कि मला
ते कुरूप बदक कधी पाण्यात स्वतःला पाहिलं
व त्याचा राजहंस होईल हे ऐकण्यासाठी कान अधीर होत.
' कल्पवृक्ष कन्येसाठी"... गाणे ऐकले की आजही अंतरमन गहिवरून येते.
अगणित गाणी,अगणित भाव केवळ तुझा कंठ हि करामत करू शकतो.
भाव गीते, अभंग, सिने गीत. ३५ भाषेतील कुठलेही गाणे ऐका,
तुझ्या दैवी आवाजाने जगाला भारावून टाकले आहेस.
स्वत: मी दुसऱ्या आवाजात कधीच रमलो नाही, रमणे शक्यही नाही.
तुझ्या स्वराना ऐकून मी तरूणच राहीन.
झाले बहू होतील बहू... तुझ्यासम कोणी होणे नाही.
सहा फेब्रुवारी सकाळी ८:१२ मिनिटाने तुझा कंठ अबोल झाला.
नुसत्या बातमीने हादरलो. जरी अलीकडे तू गात नव्हतीस.
पोटात कालवा कालव झाली, हृदयाची घालमेल झाली,
मूक होऊन टीव्ही समोर तुला शांत झोपलेले पहात बसलो.
सायंकाळी तू पंचतत्वात विलीन होई पर्यंतनजर हटवली नाही.
तुझ्या लाखो करोडो चाहत्याचे डोळे मात्र भरून आले.
पहिले प्रेम हेच खरे असे म्हणतात,
तुझ्यावरील माझे प्रेम अमर राहील.
प्रिय मैत्रीणे तुला चीर शांती लाभो ही प्रार्थना.