एके दिवशी काय झाले !
वाघाची डरकाळी जंगलातील
इतर वाघांना ऐकू येईनाशी झाली,
वाघ राजा गाय वासरांच्या व घडाळ्याच्या टीक
टीकेला भुलला त्या मैत्रीत जनतेचा,
आपल्या सैन्याचा, त्यास विसर पडला,
जंगलातील इतर वाघांची कुरबुर सुरु झाली
सैन्यातील वाघांना प्रश्न पडला
आता आपला रक्षणकर्ता राजा कोण?
एवढ्यात एक धीट वाघ पुढे आला
मित्रानो घाबरू नका ह्यावर बंड हा एकच उपाय
चला माझ्याबरोबर मी दाखवतो मार्ग,
सेनापती बनून पुकारले त्यांनी वाघांना
"खरे, सच्चे वाघ" असाल तर जागे व्हा
हे जंगल सोडून या माझ्या मागे,
त्याच्या हाकेला होकार देऊन
आले जंगल सोडून, चाळीस जण
ओरिसाच्या जंगलात पोहोचवले सेनापतीने,
शब्दास जागून त्यांची योग्य ती बडदास्त
ठेवली.
ह्या जंगलात कमळाने भरलेले
एक तळे होते त्यातील कमळे पाहून
वाघ हर्षित झाले आता त्यांची खात्री
झाली की सेनापती योग्य ठिकाणी
घेऊन आलाय. त्यांच्या खुशालीचे
वर्तमान ऐकून एक एक करून
चाळीस वाघ जमा झाले.
इथे जंगलच्या राजाला काही सुचेना
आपली राज गुहा तर्कटपणे सोडून
कुटुंबीया समवेत जुन्या स्वगुहेत आला.
घड्याळ व गाय वासरू
आता राजाचे सांत्वन करू लागले
पण मनोमनी राजा खिन्न झाला
मोठ्या गर्वाने वागल्याचा,चुकीचे
मित्र केल्याचा पश्चाताप झाला,
आता त्याला ध्वज गमविण्याची
भीती भेडसाऊ लागली
खोटे अवसान आणून
कावरा बावरा होऊन तो
सैन्य गोळा करू लागला
पण...
"बुंद से गई वो हौद से कैसे आती"
आता उशीर झाला होता,
जंगलातील इतर वाघांनी
आपला नवा नेता निवडला,
तात्पर्य :
राज्य चालविताना आपल्या सैन्याचा
सम्भाळ इतर कोठल्याही संकटापेक्षा महत्वाचा.!
*ह्या वेड्यावाकड्या विचारांचा खचखोळ वेळोवेळी माझ्या वेड्या समाधानाकरिता कागदावर उतरवीत गेलो. ह्या ना कविता, ना लेख,ना गोष्टी, ना बाल गीते,मनी जसे आले, मेंदूला जसे दिसले तसे वहीत उतरविले,हा प्रयत्न कुठल्याही वांग्मय प्रकारात शोधूनही सापडणार ना मोडणार.माझा हा टाईमपास आवडल्यास तुमचा टाईमपास करण्यास वाचावे.ह्यात शोध/बोध् घेण्यासारखे काहीही नाही,काही असले अथवा दिसले तर ते माझे abstract सेल्फ portrait असे समजावे.