माकड चेष्टा
दोन बोके. नाव त्यांची सोम्या गोम्या
एक न्यायाधीश माकड. नाव त्याचे चेष्टा
झाले बोक्यांचे भांडण कारण काय तर वाघाचा खरा नातेवाईक कोण?
न्यायासाठी गेले माकड " चेष्टा" कडे माकडांनी ४ दिवसाचा वेळ मागितला
४ दिवसांनी माकडाने आणखी ४ दिवस मागितले नावा प्रमाणे चेष्टा करत त्याने १ वर्ष ६ महिने काढले
शेवटीं वनराजाने त्यास दिली तंबी व न्यायाचा दिवस ठरविला.ते समजल्यावर लबाड सोम्यानें गोम्याच्या नकळत माकडास घरी बोलावले पंच पक्वाने जेऊ घातली वर दक्षिणा म्हणून दिल्लीची सहल घडवली माकड खुश ढेकर देत घरी गेला.ह्या दीड वर्षात माकडाने दोन्ही बोक्यांना ८ पिढयांच्या वंशावळीचापुरावा देण्यास सांगितला.
निकालाचा दिवस उजाडला आतुरतेने दोघे बोके माकडासमोर हजर झाले,माकडाने दोघांनी दिलेल्या वंशावळीचे वाचन सुरु केले. गोम्याची माहिती वाचताना काही माहिती न दिल्याचे सांगितले यावर गोम्याची येणारी प्रतिक्रिये कडे दुर्लक्ष करून
सोम्याच्या बाजूनें निर्णय देऊन टाकला व जाहीर केले, सोम्याच वाघाचा वंशज आहे. व त्यालाच वाघाचे पट्टे मिळाले आहेत.
बिचारा गोम्या हिरमुसला होऊन परतला येताना काळोखात त्याच्या हातात सोम्यानें गर्वाने चेष्टा करीत एक मशाल देत म्हणाला आता ह्याच्या उजेडाची सवय करून घे हि जर विझली तर तुझे अस्तित्वच नाहीसे होईल.
गोम्याने मशालीच्या उजेडात प्रस्थान केले वाटेत वनराजाला कडून. न्याय मिळवायचाच ह्यचा निश्चय केला .गोम्या गेलेला पाहून सोम्याने न्यायमूर्ती माकडास टाळी दिली दोघे हसत हसत आप आपल्या वाटेस लागले.
बिचारा गोम्या आता वनराजाच्या बोलवण्याची वाट पहातोय. सोम्याने मात्र आपल्या खुर्ची मागे एक वाघाचे मोठे तैल चित्र लावले.
ह्यालाच माकड चेष्टा म्हणतात.