माननीय राज्यपाल,माननीय जमलेले श्रोते गण, आणि सर्व पुरस्कार विजेते.
आज तुमच्या समोर एका नामवंन्त कला तपस्वी श्री.वासुदेव गायतोंडे कला जीवन गौरव उत्त्योच्य पुरस्कार स्वीकारताना मन गहिवरून आलेय.
हा पुरस्कार म्हणजे, माझ्या ५८ वर्षांच्या कारकिर्दीचा सन्मान. माझ्या केलेल्या कामाचा हा गौरव नसून दृश्य कला व्यवसातील प्रत्येकावर असलेल्या जबाबदारीचे मोजमाप आहे. दृश्य कला क्षेत्र, जनते मध्ये स्फूर्ती,नावीन्यता, एक नवीन दृष्टी कोन निर्माण करते त्याची हि एक सुखद शाब्बासकी .
हा पुरस्काराचा मानकरी मी एकटा नसून असंख्य ग्राहक, ज्यांनी मला आज तुमच्या समोर एक प्रतिनिधी म्हणून उभे केलय, तसेच व्यवसातील माझ्या सर्व अनुभवी वरीष्ठ ज्यांनी पदो पदी मला योग्य मार्ग व माझ्यावर विश्वास दाखविला त्या सर्वांचा यात मोठा वाटा आहे.
आज ह्या व्यवसायात येणाऱ्या सर्व तरुण मंडळींना छोटासा कानमंत्र.
इतरा पेक्षा वेगळी स्वतःची स्वप्ने पहा. जाहिरात बनवणे हे तुमचे वेड असू द्या. तुमच्या पुढे येणाऱ्या प्रत्येक समस्या एक नवी चॅलेंज आहे असे समजा. थोडक्यात तुमच्या जागेपणी, झोपेत, चालताना बोलताना लिहिताना कामास श्वास समजा. ही अत्यंत महत्वाची कला आहे. जेथे तुमची बुद्धी दिलेल्या चौकटीस नेहमीच्या रटाळ विचाराना तोडून उत्तर शोधावयाचे असते व जनतेस योग्य प्रचार करून आपलेसे करावयाचे असते हि जबाबदारी पेलण्याची तयारी असेल तरच या, केवळ ह्या क्षेत्रात दिसणाऱ्या दिखाव्याला फसू नका.
महत्वाची पण उपयोगी टिप म्हणजे कोठेही असाल तेथील आसमंत समरणशक्तीत भरून ठेवा, उदाहरणार्थ, समजा तुम्ही कोणाच्या घरी पहिल्याने प्रवेश करत असाल तर त्या घरात शिरताना तुमच्या मेंदूचा कॅमेरा चालू ठेवा प्रत्येक दिसणारी गोष्ट टिपत जा, एव्हढी कि तुम्हाला सोफा, खिडकी पडदा जमीन पंखा है सर्वांची चित्रे नंतर आठवली पाहिजेत. ह्याला 'ऑबसेर्व्हशन',म्हणतात जे तुमच्या कामी कधीही केव्हांही उपयोगी येऊ शकते. ह्या सवयीची जर तुम्हा युवकांना प्रॅक्टिस करायची असेल तर तुम्ही रस्त्यावर, मार्करत मध्ये ट्रेन मध्ये बस मध्ये दिसणाऱ्या असंख्य चेहऱ्यातील केवळ दोन चेहरे राती झोपण्यासाठी डोळे बंद करण्यापूर्वी डोळ्या समोर आणा.
जाहिरात क्षेत्रात तुम्हाला रोज नवीन गणित सोडवायचे असते ते तुम्ही किती कल्पना शक्ती वापरून सोडवता ह्यावर तुमचे यश असते. हि शक्ती वाढविण्यासाठी वाचन, लेखन, समरणशक्ती फारच उपयोगी पडते.
असो. भाषण लांबवीत नाही. ज्या कुणाला "हे काय कोणीही करू शकेल" वाटत असेल त्यांनी ह्या क्षेत्राच्या जवळ पास देखील फिरकू नये.
या यशाचा सारांश म्हणजे अपार मेहनत, इतरां पेक्षा नवीन कल्पनेने आलेले गणित(विक्री वाढविण्याचे ) सोडविणे.
सर्व मान्यवरांचे व समोर असलेल्या प्रेक्षकांचे कान भरल्याबद्दल क्षमस्व.
अरुण, तुला आज जो सन्मान मिळाला आहे तो खरोखरीच तुझ्या जाहीरात क्षेत्रातील योगदानाबद्दल तर आहेच, शिवाय आज शासन दरबारी जेथे उपयोजीत कलेची उपयुक्तता न जाणवून केवळ स्वतःच्या कामापुरता तिचा वापर करून सतत केवळ ललित कला म्हणून तिला डोक्यावर नाचवणाऱ्या व उपयोजीत कलेला अडगळीत टाकणाऱ्या शासनाच्या डोळ्यांत घातलेले झणझणीत अंजन आहे. हा सन्मान तुझा तर आहेच, शिवाय आजवर होऊन गेलेल्या अनेक सर्जनशील कलावंतांचा, पर्यायाने अवघ्या उपयोजीत कला क्षेत्राचा आहे. आणि तो तू मिळवलास हे अत्यंत अभिमानास्पद आहे. आज तू जो संदेश आजच्या तरुण पिढीला दिला आहेस, त्यावरून तुझे वेलस्पन चे कॅम्पिअन आठवते. त्यामध्ये प्रवाहाविरुद्ध पोहणारा माणूस दाखवला होता. आणि अश्याच व्यक्ती इतीहास निर्माण करतात. त्यातूनच एक अरुण कळे जन्म घेतो.
ReplyDeleteतुझे या पुरस्कारावरील मनोगत हृदयस्पर्शी आहे. मनाला भावणारे व थेट अंतर्मनात प्रवेश करणारे आहे.