तू आहेस !!!!
तू आहेस तरी कोण?
थोड्यावेळासाठी समजा, मी तुझे अस्तित्व विसरलो,
मग हे विश्वास न बसणारे चमत्कार कोण करतो?
उत्तराची सुई तुझ्या दिशेनेच फिरते.
परवा झालेल्या अहमदाबाद विमान अपघातात
२३०पैकी २२९ मृत होतात आणि एक प्रवासी एवढ्या मोठ्या
अपघातून सहीसलामत वाचतो, नाही तू वाचवतोस? का?
माझ्या बुद्धीस हा तुझा चमत्कारच!!!
काही तरी कारण, जे केवळ तू जाणतोस.
२३० प्रवाशांमधून एक जीव वाचवलास.
चक्रावलेला मेंदू, डोळे मिटून,
हात जोडून स्वगत पुटपुटतो.
विश्वास ठेव, किंवा न ठेवूही शकतोस,
तू आहेस!!!!


