Tuesday, October 23, 2018

वेळ आणि लाटा






येणारच होती...
ती वेळ देखील येऊन ठेपली
आज आमच्यावर, उद्या तुमच्यावर, अटळ हि वेळ
ही वेळ खरी खोटी करणे कठीण
कुठली सांगू?... 
“आमच्या वेळी ना...”हीच ती वेळ
१ रुपयाला ४ डझन केळी...
फक्त ३ रुपये मुंबई ते रत्नागिरी बोटीचे तिकीट...
अशा वेळेला ऐकणाऱ्याने मान डोलावून
“होय महाराजा”मनात म्हणायचे
सांगणाऱ्याच्या काळात आपण जाणे अशक्य!!
आता आली माझी वेळ सांगायची
“आमच्या वेळी ना...”
मुंबई चे रस्ते रोज धुवायचे,
१ आण्यात ग्रांट रोड ते दादर टी टी ट्राम तिकीट,
घर भाडे केवळ १० रुपये महिना 
आमच्या वेळेचे ५ रु. म्हणजे आजचे ५०० रु,
वगैरे ,वगैरे , वगैरे ...
 तुमच्या काळातील आय फोन फक्त १ लाखात...
घेताना देखील आम्ही पहिले,
आता तुम्ही वाट बघा तुमच्या वेळेची
त्या वेळेस ऐकणाऱ्याला
५.८ मिलीयन डॉलर्सची ‘बुगाटी दिवो’
देखील स्वस्त वाटेल.
गम्मत अशी की,
आमची वेळ तुमची आणि
तुमची वेळ आमची
जगाच्या अंता पर्यंत येतच राहणार.

वेळ आणि लाटा,कधीच थांबणार नाहीत.

Friday, October 19, 2018

दसरा























    दसरा सण मोठा|
   नाही आनंदा तोटा||
   


Tuesday, October 16, 2018

भरकट २








मी रिकामा मन रिकामे,
वही रिकामी करायचे आता काय?
काम रिकामे, खिसा रिकामा,
गळणार कसा घाम,
घाम नाही म्हणून छदाम नाही
आता उरलय केवळ रिकामपण,
आहे की नाही रिकामी गम्मत!!


उत्तर नाही माझ्याकडे
ह्या रेखाटनाचे हे असे का?
क्यूब का काढला?
त्याला नाक डोळे का?
कान देखील का?
तो पोकळच का?
त्यावर स्टूल का ठेवले?
स्टूलावर घागर का?
घागरीत फुले का?
मला नाही माहित
जात नाही माझा वेळ
म्हणून हा मेंदूचा खेळ!!!
समजले?

Thursday, October 11, 2018

भरकट

कधी कधी विचार भरकटतात त्यातील हि एक भरकट.



दोन गोष्टी साध्या, पण आचरण्यास कठीण
पहा प्रयत्न करून परत मागण्याचा
केलेले प्रेम
दिलेले दान
आहे का कोणाची 
बिशाद परत मागायची?
ह्या वर एकचउपाय 
करत रहा,करत रहा
निस्वार्थी प्रेम
करत रहा निस्वार्थी दान
जीवनाचा अर्थ ह्यातच शोधत रहा,
-------------------------
 कुणीतरी  मला विचारले तू कोण?
मी त्यास उलट विचारले  तू कोण?
उत्तर आले मी त्रिकोण
मी उत्तरलो मी चौकोन
आपल्यातील फरक
फक्त १८० अंशाचा
पण गणितज्ञासाठी
मात्र जमीन अस्मानाचा!!
-----------------------
सत्य असत्य
आपल्यावर लादले जाते
त्याची जाण होईपर्यंत
आयुष्याचा खेळ संपत येतो.
----------------------

Tuesday, October 9, 2018

दिवा स्वप्न









शाळा,अभ्यास माझ्या व्याख्येत कंटाळा.
माझ्यासाठी शाळा ही एक दिवा स्वप्ने बघण्याची जागा होती.
त्या ‘तारे जमीन पर ‘मधील मुलासारखी.
तासाच्या सुरवातीस ५ मिनिटे लक्ष मग ‘खयालोमे.
मी ११वी पास कसा झालो 
हे एक मलाच पडलेले कोडे आहे.

लहानपणापासून मला कुठलेही 
घरकाम करावयास आवडायचे
आजही आवडते, कारण तो वेळ म्हणजे
मधली सुट्टी, मी मनन, चिंतन,
विचारांचे मंथन मन मोकाट दिवा स्वप्नात गुंग.

आज, रविवारीही तसेच झाले,
घरातील कपड्यांना आज इस्त्री करा हो,  
बायकोचे फर्मान सुटले,   
कपड्यांचा ढीग पाहून खुश झालो
चला आता तास दीड तास माझा (स्वगत)
सुरुवात केली आणि मी दीड तास कुठे कुठे फिरलो
केवळ गम्मत म्हणून ऐका ...
इस्त्री तापण्याचा अवकाश  आणि
विचारात नसलेली राणी मुखर्जी मनात अवतरली,
हि स्वतः इस्त्री करत असेल का?
आमिरच्या  घरात किती नोकर असतील?
कधीतरी कंगना आपल्या घरात 
खुर्चीवर बसली असेल का?
की पलंगात पडून सर्व कामे सांगत असेल?
सचिन चीनला गेला असेल का?
सोनाली कुलकर्णीचा शिंपी कोण असेल?
मला तैल चित्रे जमतील का?
गरोदर लुसिला या वेळेस किती पिल्ले होतील
बँकेत पास बुक कधी टाकावी?
कान अवार्ड्स साईट बघायची राहिली आहे
उद्या ऑफिसची डेडलाईन आहे
नवे कॅम्पेन प्रेझेंट करांवयाचे आहे,
शाह रुखने कधी कणकेचा लाडू खाल्ला असेल का?
एका पाठो पाठ असे वाऱ्याच्या  झुळूके सारखे
प्रत्येक कपड्या गणिक विचार फिरत होते
इस्त्रीचा ढीग कधी संपला कळलेच नाही
मी मात्र स्वप्नात छान रमलो.


  







चाफा आणि सोनटक्क्याचेअबोल प्रेम

 मी पाहिलंय ते अबोल प्रेम,    ते देखील दुतर्फी, विचार करा १ नाही तर ५ वर्षे  त्याचे रोज तिच्या बाकावर  नियमितपणे ती यावयाच्या पूर्वीच  हळुवा...