पश्चिमेचे वारे आपल्या संस्कारात वाहू लागल्यापासून
आपण भारतीय देखील मोठ्या आनदाने हे वेग वेगळे ‘दिवस’(डे)साजरे करू लागलो काल काय
तर फादर्सडे, उद्या फ्रेन्डशिप डे,परवा
सिब्लीन्ग्स डे, येरवा टीचर्स डे, मग येणार नेबरस, त्यानंतर अनिमल्स, मग इस्टर सन
डे,
‘मदर्स डे’
सकाळ सकाळीच मुलांचा फोन अमेरिकेहून
आपल्या आईस ‘मदर्स डे’च्या शुभेछा देण्यास
खणखणला.
माझ्या आईच्या भाग्यात ह्या शुभेच्छां नव्हत्या.
पण तिची आठवण मात्र ह्या निमित्ताने
रोजच्या पेक्षा थोडी अधिक झाली व डोळ्यासमोरून
५७ वर्षाच्या तिच्या सहवासाचा चलचित्रपट
५७ सेकंदात सरकला,मनोमनी शुभेच्छा व्यक्त केल्या.
तिची जेव्हां जेव्हां आठवण येते... न कळत ओठावर
प्रेमस्वरूप आई वात्सल्य सिंधु आई...
ह्या माधव
जुलियन यांच्या कवितेतील
हे कडवे
प्रकर्षाने गुणगुणले जाते.
वाटे इथून जावे तुझ्यापुढे निजावे
नेत्री तुझ्या हसावे , चिती तुझ्या ठसावे
वक्षी तुझ्या परी हे केव्हां स्थिरेल डोके
देईल शांतवाया ह्त्स्पंद मंद झोके
घे जन्म तू फिरुनी येईन मीही पोटी
खोटी ठरो न देवा हि एक आस मोठी
अर्थातच माझ्याप्रमाणे असंख्य,अगणित आई विना असतील
ज्यांना आईची उणीव रोजच भासत असेल
रोजच मनोमनी 'मदर्स डे'च्या शुभेछा
आपल्या आईस देत असतील.
भूतलावरील सर्व माताना माझा प्रेमपूर्वक नमस्कार.
happy mother's day.