सकाळ झाली,जाग आली,
पापण्यात उरलेली झोप घेऊन उठून बसलो,
घरात मात्र सामसूम
घरात मात्र सामसूम
सर्वांची जणू मध्यरात्र
पक्ष्यांची किल बिल, हळुवार येणारी
मंद झुळुक
चंद्रकोरीचे सूर्याआड होणारे अस्पष्ट
दर्शन,
देऊळातील घंटानाद,चर्च मधील
पियानो,
मशीदितील बांग, तांबडे फुटलेले
आकाश,
अस्पष्ट ऐकू येणारा रेडीओ,
वाहनाची सुरु झालेली वर्दळ,ऐकली नाही
तर उजाडणारा दिवस देखील
तर उजाडणारा दिवस देखील
झोपलेला वाटतो ...
सवयी प्रमाणे डोळ्यासमोर वार,तारीख आली
सवयी प्रमाणे डोळ्यासमोर वार,तारीख आली
आज सोमवार, ६मे २०१९,
आज आई १०४ वर्षाची झाली.
माते, असशील तेथे,
तुझा वाढ दिवस सुखाचा जावो...
तुझे आशीर्वाद,
हीच आमची अनमोल ठेव.
No comments:
Post a Comment