Saturday, June 29, 2019

पाऊस



आला आला  आला,

उन्हाळ्याला आंघोळ घालीत
धरतीला सुगंधी मिठीत घेत,
झाडांना, हिरवे लाजवत,
कौलांवर टप टप टप आवाज करीत ,
कडाड,कड,कडाड करीत, 
वीजेरी घेऊन काळ्या ढगांना उजाळत ,
दुष्काळाचे  सावट ओले करीत 
राज्यभर पसरला,
बळीराजाना  आनंदवले,
पेरणीच्या तयारीला लावले
चातकाची तहान भागवत, 
ढगांच्या तालावर, मोरांना नाचवत,
श्रावणाच्या कोवळ्या उन्हात बागडून,
सणवार सुरु करीत,
आला पाऊस आला!!

Wednesday, June 12, 2019

अळणी सत्य


tv वरील जाहिराती बघणे हा माझा छंद,
... परवा शुद्ध मीठाची जाहिरात लागली ती अशी
एक बाई सुपर मार्केटच्या पैसे देण्याच्या ठिकाणी
विकत घेतलेल्या जिनसा पट्यावर  ठेवत असते
counterवरील बाई वस्तू न्याहाळत असते,
जसे मिठाचे pack येते त्यावर...

सेल्सवूमन: हे काय बाकी सर्व वस्तू शुद्ध घेतल्यात
आणि मीठ मात्र साधे?
गृहिणी: म्हणजे? 
सेल्सवूमन: मिठही शुद्ध घ्या हे पहा अमुक...मीठ
यात जरा देखील रसायने नाहीत ...
जाहिरात पहिली मात्र आणि मनात गणित मांडले,

अशुद्ध रसायनवाले मीठ १ किलो घेतल्यास
त्यात रसायनाचे प्रमाण ‘क्ष’असेल समजा,
१ किलो= १००० ग्राम  मीठ ४ जणांच्या कुटुंबास अंदाजे
३० दिवस चालले तर एका माणसास एका दिवसाला  ८. ३४ ग्राम 
 मीठ दिवसास वापरात येते
जर १००० ग्रा.मध्ये क्ष% रसायन तर ८.३४ ग्रा. मध्ये किती? अंदाजे
०.००८३४ एवढे सुक्ष्म रसायन प्रत्येकी पोटात जाईल
ह्या सुक्ष्म प्रमाणात रसायन पोटात गेल्यास मनुष्यास
किती त्रास किती दिवसाने/ वर्षाने होईल हे आपण ठरवायचे.
शुद्ध आणि अशुद्ध मीठाच्या किमतीत असलेली तफावत
कमीत कमी १०% नक्कीच,ह्यास तुम्हीच तुमच्या 
पुढील महीन्याच्या खर्चात मिळवा म्हणजेच 
महिन्याच्या किराणा खर्चातकिती वाढ होईल ह्याचा हिशोब करा,
मग लक्षात येईल की हि केवळ जाहिरातबाजीने
भीती घालून केलेली लूटमार आहेहे सुज्ञास सांगणे न लगे.

जाहिरात क्षेत्रात दीर्घ काल असल्यामुळे
एक महत्वाचे गुपित सांगतो,
बहुधा ८०% जाहिराती ह्या तुम्हाला
१.भीती २.हाव ३.भावना ह्यावर
आधारलेल्या असतात. उरलेल्या
२०% वस्तूच्या गुणधर्मावर.

आता पुढील गणित तुम्ही सोडवा
जाहिरातीतील मीठ घेणारी बाई अंदाजे ४५ वर्षे
मीठ विकणारी बाई अंदाजे ३२ वर्षे
शुद्ध मीठ बाजारात आल्याचे साल २०१९
ह्या दोघीच्या पोटात आज पर्यंत किती %रसायने
अशुद्ध मिठाने गेली असतील? त्याचा त्यांच्यावर
किती परीणाम झाला असेल?

केवळ भीती घालून केले ना तुम्हाला मूर्ख?
ग्राहका जागृत रहा!


Monday, June 3, 2019

पेहचान कौन


काल रात्री,नेहमीच्या वेळेस,  
डोळे मिटून बिछान्यात येऊन पडलो,
बराच वेळ झाला, कां कुणास ठाऊक
झोप काही केल्या डोळ्यातून मेंदूत शिरत नव्हती,
चाचपडत सेल फोन शोधला  फोनवर
श्रेया घोशालला अंगाई  गीत गाण्यास बोलाविले
ती गाऊन दमली आणि गेली




झोपेचे झालेले खोबरे तसेच,  
मग जुन्या मित्राला महमदला गा सांगितले
तोही चांगला तासभर  गायला असावा,दमला,
पण मेंदूचे घुबड काही झोपेना,
सेल फोनला विश्रांती दिली  
एव्हाना पहाटेचे ३ वाजून गेले
आकडे मोजून झाले, मेंढ्या मोजल्या,
मग पंतप्रधान मोदींचे नवे मंत्री मंडळही
नव्याने निवडले त्यांचा शपथ विधीही 
पार पाडला झोपेच्या आशेने,आता मनाचा टी वी बंद केला,
तरीही झोप येईना मग स्वतःच
“ निंबोणीच्या ...”गुण गुणलो तरीही...
जागते रहो... कानात घुमतच होते
किल किल्या डोळ्याने घड्याळ पहिले चार वाजले
ध्यानाची उत्तम वेळ म्हणून उठून बसलो
पण ध्यानासाठी तनमन तयार होईनात
मग तसाच डोळे घट्ट मिटून झोप येईल 
ह्या आशेने बसून राहीलो, एव्हढ्यात...
शांततेत रात्रपाळीच्या पाहरेकऱ्याच्या
फोनवरून गाण्याचे बोंल कानावर पडले
मी कुत्र्यासारखे कान टवकारले कानोसा घेत
गाण्याचे सुमधुर आवाजातील बोल ऐकू लागलो  
स्मित हास्य करीत बसल्या स्थितीतून हळू हळू खाली सरकत गेलो
डोके उशीवर कधी घरंगळले...
...जाग आली तेव्हां आता वाजले की बारा परिस्थिती !!
एवढ्या सुमधुर आवाजाची किमया/जादू/
जगाच्या पाठीवर कोठेही असणे अशक्य
 ते जादूचे गाणे...
धीरे से आजा री अंखियनमे
निन्दिया आजा री आजा, धीरे से आजा
छोटेसे नैन की बगीयन मे...
गायक? पहचान कौन.,.

चाफा आणि सोनटक्क्याचेअबोल प्रेम

 मी पाहिलंय ते अबोल प्रेम,    ते देखील दुतर्फी, विचार करा १ नाही तर ५ वर्षे  त्याचे रोज तिच्या बाकावर  नियमितपणे ती यावयाच्या पूर्वीच  हळुवा...