Saturday, July 13, 2019

एक सुवर्ण संधी





काल मी वर्तुळ पूर्ण केले.
१९६७ साली मी जेजे सासरी जाणाऱ्या
मुली प्रमाणे दुखःद अंतकरणाने सोडले.
जाहिरात विश्वात झोकून दिल्या मुळे
गेल्या ५० वर्षात १०/१२ वेळाच माहेरी
(जेजे ) फेरी मारली असेन. प्रत्येक फेरीस तेथे
घालवलेली आयुष्यातील सर्वोत्तम ५ वर्ष
डोळ्या समोरून सरकली की पुढचे ५ दिवस
मी त्याच स्वप्नामध्ये रमायचो.(‘श्रावण’ ब्लॉग वाचा)
गेल्या ८ दिवसापूर्वी अचानक मला जेजे च्या
डीनचा फोन आला व त्यांनी ‘मी विद्यार्थ्याना मार्गदर्शन
करण्यास adjunct faculty म्हणून 
येऊ शकेन का?’ अशी विचारणा केली
मी क्षणाचाही विलंब न घेता ‘हो’म्हंटले,
मला शिकविण्याचा गमभन ही अनुभव नाही 
मग हा, ‘हो’ म्हणण्याचा उत्साह कोठून आला?
मनाच्या कुठल्यातरी कप्प्यात लपलेली  
सुप्त इच्छा जागी  झाली असावी,
कि सुवर्ण संधी न सोडण्याचा आदेश 
माझ्या पूर्व गुरुजनांनि नकळत मला दिला,
आता हि जबाबदारीची  खिंड लढवावीच लागेल.
५० वर्षाचा अनुभवाची पोतडी घेऊन.
नवीन विद्यार्थी मित्रां सोबत अनुभव वाटण्यास
मी सज्ज झालोय, मिशन यशस्वी करणे 
हे आव्हान आता पेललेच  पाहिजे.

माझ्या सर्व गुरुजनानचे नामस्मरण करून
ह्या शुभ कार्यास वाहून घेतो.






Tuesday, July 9, 2019

अजब न्याय = सत्य कथा






























एका उच्चभ्रू बाईने तीन नवरे केले, पहिला सोडला बिन पैशाचा म्हणून.
पण झाली दोन अपत्ये त्याच्या पासून.  मुले ठेवली आई कडे, केले दुसऱ्याला जवळ,  लग्न करून भागवायला हवस. जसा आला कंटाळा दिली सोड चिट्ठी अन गाठला तिसरा. 
गडगंज श्रीमंत १ मुलाचा बाप. राहू लागली बिन लग्नाची राणी म्हणून त्याच्या बरोबर. 
पहिल्या नवऱ्या पासून  झालेल्या मुलीस घ्यावयास लावले तिसऱ्यास दत्तक
त्याचा पैसा मुलीच्या नावे होईल ह्या दूरदर्शी विचाराने.मुलगी राहू लागली आई बरोबर. 
पण जगासमोर आईने जवळ केले मुलीला बहीण ह्या नात्याने, येथे बाई फसली,
सावत्र मुलगा पडला प्रेमात बाईच्या बहिणीच्या(मुलीच्या),बाईला भीती वाटली बिंग फुटण्याची,
तरुण प्रेमाने वेग घेतला तशी बाई थरथरली हातातून तेल तूप धुपाटणे सर्व जातंय पाहून डाव रचला अन काढला की हो काटा बहिणीचा (पोटच्या मुलीचा) घटस्फोटीत नवऱ्याच्या मदतीने.
घटस्फोटीत नवरा, वाहन चालक, झाले भागीदार रक्ताने हात माखले तिघांचे.
आले जाळून पुरून जंगलात. काढली सर्वांनी दोन वर्षे खून पचवील्याच्या  आंनदात.
झाले एक दिवस खुनाला वाचा फुटली.वाहन चालक सापडला तिसऱ्याच कारणाने कायद्याच्या कचाट्यात. पोलिसी खाक्या भोगल्यावर  माफीचा साक्षीदार बनून आधीचे गुन्हे,व मालकिणीचे काळे कृत्य तपशीलवार  भडाभडा ओकला.ऐश्वर्यात लोळणाऱ्या आईला मृत मुलीने तुरुंगाची फरशी दाखवली फाशीचा फंदा  आईच्या डोळ्यासमोर झुलवीत.

४दिवसा पूर्वी झळकलेली बातमी.

वरील बाई आता माफीचा साक्षीदार होणार!
आहे की नाही कायद्याने दिलेला एक अद्भूत अजब  न्याय.
(कारण पूर्व अर्थमंत्री आणि त्यांचे सुपुत्र ह्यांचे पाय एका अर्थ्व्यव्हारात तिच्या बरोबर बांधलेत,
शक्यता पूर्व अर्थमंत्री देखील तिच्या बरोबर तुरुंगवासभोगू शकतील.)

चाफा आणि सोनटक्क्याचेअबोल प्रेम

 मी पाहिलंय ते अबोल प्रेम,    ते देखील दुतर्फी, विचार करा १ नाही तर ५ वर्षे  त्याचे रोज तिच्या बाकावर  नियमितपणे ती यावयाच्या पूर्वीच  हळुवा...