मला काय?
तुला काय?
ह्याला काय?
त्याला काय??
कुणाला काय? तर कुणाला काय
मग चाललय काय?
ट्राफिक नाही हलत,
पाऊस नाही थांबत,
ट्रेन नाही चालत,
विरोधकांसाठी सरकार नाही चालत,
इविएम मशीन्स देखील नाही चालत,
मग चाललय काय?
खऱ्याखोट्या नोटा
पेटीएम,क्रेडीट कार्ड,
लष्कराची दमदाटी,
राजकीय हेरां फेरी,
बँकांची लुट मार चालूच
मग चाललय काय?
निवडणुका कोपऱ्यावर आल्यात
मोठे मोठे मासे इडीच्या जाळ्यात
खुर्चीसाठी पक्षी उडतायत,
स्वाभिमानी भुंगा कमळाभोवती
पिंगा घालतोय,ऐका,नऐका
गृहमंत्र्यांच्या नवीन गर्जना
चालूच आहेत
आता जणगणना म्हणे फोनवर,
विलीनीकरणाच्या भीतीने
बँका संप मागे पुढे करतायत,
अहो अचानक बँका बंद होतायत
खातेदार रस्त्यावर रडतायत
अर्थमंत्री कॉर्पोरेट ना खुश
करून
स्वतःखुश होऊन भरतनाटयम करतायत,
इटली,मुक सरदारांना घेऊन
लुंगीला भेटायला तिहारचा
फेरफटका मारतायत
विराट धक्के मारून संघास निडर
बनवतोय,
कंगना अम्मा बनण्यासाठी कष्ट
घेतेय,
शेअर बाजार वधारतोय,
हो, चद्रयानाचे भ्रमण थांबले
पंत प्रधानांचे भ्रमण मात्र जोरात
चाललय,
मग चाललय काय?
हे सर्व बघत ऐकत तुमचे, माझे,
आयुष्याचे रहाट गाडे चाललय!