Sunday, September 1, 2019

आगमन







अहो बघता बघता लागला की हो
९वा महिना या वर्षाचा.
सुरुवात किती छान हर्तालीकेच्या पुजेने,
उद्या पासून तर जल्लोष सुरु होणार
सर्वांच्या लाडक्या दैवताची,श्री गणेशाची,
आनंदाची लाट घेऊन होणार आगमन.
‘गणपतीबाप्पा मोरया,’
‘पायी हळूहळू चाला मुखाने गजानन बोला’,
सुखकर्ता दुखःहर्ता... जल्लोषात.  
सर्व शहरातून,गावागावातून
मंगलमय वातावरण पसरेल.    
श्री गजानन, घरो घरी,
आपले बस्तान बसवतील.
शहरातून प्रत्येक नाक्यावर सार्वजनिक
गजाननाची स्थापना होईल,
आमचा राजा, तुमचा राजा,त्यांचा राजा,
श्रीमंत राजा,पाहण्यास,देवदर्शनास
उन्हा तान्हाची पर्वा न करता
लांब,लांब रांगा लावतील,
हा उत्साह अनंत चतुर्दशी पर्यंत
वाढतच जाईल.
अनंत चतुर्थीचा दिवस बाप्पाला,
जड अंतकर्णाने निरोप देण्यास
सर्व महाराष्ट्र एक मुखाने
“गणपतीबाप्पा मोरया
पुढच्यावर्षी लवकर या”
गर्जनेत बाप्पाचा निरोप घेतील.
पुन्हा रोजच्या रहाटगाडग्याला
स्वतःला जुम्प्तील.
मनात मात्र गजाननाच्या
आठवणीनेs पुटपुटतील  
“गणपती आले नाचून गेले”

No comments:

Post a Comment

चाफा आणि सोनटक्क्याचेअबोल प्रेम

 मी पाहिलंय ते अबोल प्रेम,    ते देखील दुतर्फी, विचार करा १ नाही तर ५ वर्षे  त्याचे रोज तिच्या बाकावर  नियमितपणे ती यावयाच्या पूर्वीच  हळुवा...