Tuesday, February 11, 2020

शंभर

शभंर

१८ जुलै १९९८
ओळख लेखाने(?) स्वतःची ओळख
करून दिली,तेव्हां वाटले देखील नाही
की, मी १०० कागद भरून काढेन.
एक १०० पानी वही भरली
माझ्या वेड्या वाकड्या विचारानि?
विचारू नकात किती जणांनी वाचली?
कोणी वाचो की न वाचो, लिहिण्या 
पाठीमागील उद्देश हा लोकांनी वाचावे नव्हताच
किंवा कोणी वाचून कौतुक करावे,
हि शंभर पाने म्हणजे माझ्या डोक्यात 
वेळोवेळी गरगरणारे विचार, ते डोक्यातून
कागदावर, कागदावरून संग्रही राहावे म्हणून
ब्लॉगवर ह्यातून बोधप्रय घ्यावे असे काही नाही. 
कोणी अभिप्राय द्यावे हि अपेक्षा हि केली नाही. 
अधिक लोकांनी वाचावे ह्या करिता फेसबुक वर 
जाहिरातही नाही केली. आपले हसे आपणच पाहावे 
नाही ह्सावे  त्याचे प्रदर्शन करावेसे हि नाही वाटले

आज पर्यंत १०० हा आकडा क्रिकेट बोर्डावर. नोटेवर, 
पाहिलाय एरवी शाळेपासून तो रेषेच्या खालीच पाहिलाय.
पण अलीकडेच मला १००/१०० मिळाल्याचा आनंद 
मिळालाय,नाही झालाय.


ह्या जुलै महिन्यात मी जे जे  त एक सहायकं शिक्षक 
म्हणून बोलावला गेलो.माझ्यावर २१ मुलांची जबाबदारी 
दिली गेली.२ एक महिन्यात ती संख्या १२ वर ढासळली. 
काही मुले सोडून गेली काहींनीबहिष्कार टाकला व काहींनी 
माझ्या पेक्षा दुसरे साहायक बरे म्हणून त्यांच्या वर्गात 
जाणे पसंद केले.
ऑक्टोबर महिन्यात माझ्या वर्गात ६ मुली
२ मुलगे असे एकूण ८ विद्यार्थी उरले, ज्याना 
माझे मार्गदर्शन योग्य वाटत असावे.
शेवटचे हे महिने म्हणजे वार्षिक प्रदर्शनाची
तयारी. आपले काम ह्या प्रदर्शनात लागावे हि प्रत्येक 
विद्यार्ह्याची इर्षा त्या साठी सर्व झटून कामास लागतात, 
त्या साठी माझ्या ८ विद्यार्थ्यांनी देखील झटून कामे केली.
प्रदर्शनासाठी एकूण ५४ विद्यार्थ्यांनी कामे निवडीसाठी
जमा केली. त्यातील ३७ कामे निवडली गेली. 
माझ्या ८ हि विद्यार्थ्यांची कामे निवडली गेली 
म्हणजेच मी १००% नि उतीर्ण झालो. 
योगा योगाने हे माझ्या १०० व्या लेखाबरोबर व्हावे,
हा मात्र माझ्यासाठी,‘सम समा संयोग कि जाहला’.
अर्थात ह्यात विद्यार्थ्याचा वाटा सिंहाचा.

माझ्या अनुभवाच्या विद्यार्जनाचे सार्थक झाले 
हे माझ्याकरिता मनपूर्वक नाही
१००% समाधान.

1 comment:

चाफा आणि सोनटक्क्याचेअबोल प्रेम

 मी पाहिलंय ते अबोल प्रेम,    ते देखील दुतर्फी, विचार करा १ नाही तर ५ वर्षे  त्याचे रोज तिच्या बाकावर  नियमितपणे ती यावयाच्या पूर्वीच  हळुवा...