एक मित्र व एक मैत्रीण गेल्याचे फोन वर
कळले. मेंदू सररर करून वर्गात जाऊन बसला,
मित्राच्या जागेवर खिळली,. अर्थात त्याबरोबर
घालविल्या दिवसांची आठवणही उजाळली.
बातमी आलेली मैत्रीण खूप हुशार होती.
ह्या बातम्या आता अंगवळणी झाल्या होत्या,
ह्या वरून मनात एक वावटळ उठली.
वेग वेगळ्या वयात येणाऱ्या बातम्यांचे महत्व,
स्वरूप त्याच वयात कळण्या सारखे असते
वय वर्षे ५/६
झाली कि अवती भवतीच्या
ह्या वयात आपल्याला वाढदिवसाच्या बातम्या
कानावर येतात आज बबनचां
वाढदिवस उद्या चिंगीचा... आनंडी आनंद
वय १० ते १५...
आर्या पहिली आली, विनोद ला ९०%
आशीर्वादला विज्ञान शाखेत प्रवेश मिळाला,
मालिनी चे अरंगेत्रम शुक्रवारी...
आपले काय प्रश्न?
१६ ते २०...
देव आनंदचा ‘काला बाझार,’ मेकांनाज गोल्ड
कसला तुफान, हिच्कोक भन्नाट डिरेक्टर,
नौशादने
कसले म्युझिक दिलय यार...
अशोक इन्जिनिअरिन्गला गेला...
अनिल मेडिकलला जायचे म्हणतोय...
आपले काय... प्रश्न?
निर्मला मास्टर्स करायला यु एसला
गेली, वाडकरांचा सुरेष शिक्षण सोडून
गातो म्हणे,गणेशचे लग्न ठरलय,
रघु आणि मैना पळून गेले...
आपले काय... प्रश्न?
२५ ते ३०...
सन्नी, मोहन,गंगा... जवळजवळ
सर्वांची लग्न झाली, आशुतोष नेहमीच
सर्वापुढे त्याला दोन लेकरे आहेत आणि
बंगळूर मध्ये स्थायिक देखील झाला...
आपले काय... प्रश्न?
जामसंडेकर अमेरिकेत सेटल झाला,
परवा गौरीच्या मुलीचे लग्न खांडेकरच्या
मुलाशी ठरले, राघव च्या पार्टीत कसली
धमाल केली, जुन्या आठवणी गप्पाना उत
आला पहाटेचे ३ वाजले... बापटची आई वारली,
सारंग चे वडील १५ दिवसापूर्वी
गेले...
आपले काय... प्रश्न?
कामातून गेली, काशीला डायाबेटीसने
फुल ग्रासलेय, हरीश आता मोदीचा
टेक्निकल सल्लागार झालाय वट वाढली
लेकाचे करून करून भागले आणि...
वृंदा, भारत भारतात परतले
पुण्यात सेटलझाले,शामच्या
मुलाने आई बापाला केसरी
मधून जग फिरवले
६५ ते ७५...
आपले काय... प्रश्न?
मधुकर गेला...हरीचे पण खरे नाही
शालिनी शिव गेल्या पासून एकटी पडली
घनश्याम वृद्धाश्रमात राहायला गेला,
मंदाकिनी मंदारचा आजार काढून थकलीय...
आपले काय... प्रश्न?
आतापर्यंत तरी आल वेल...! उत्तर.
अशा ह्या वयोपरत्वे बातम्या माझ्या
कानावर पडत गेल्या व त्यांचे ह्या
वावटळीत शब्दांकन करावेसे वाटले.
ह्यालाच जीवन ऐसे नाव...
What you have written is so true!
ReplyDelete