Saturday, February 29, 2020

दुसरी पाटी.


दुसरी पाटी.                                            *


६/७ वर्षाचा होतो, इयता  दुसरीत प्रवेश घेतला तेव्हां,दप्तरात एक पाटी, दुधी पेन्सील , अंकल्पी, मधल्या सुट्टीतील खाऊचा डब्बा. प्रार्थना झाल्यावर आम्हाला, आमच्या वर्ग शिक्षिका तेलंग बाई पहिल्या मजल्यावरील वर्गात रांगेतून घेऊन जायच्या. तेलंग बाईंच्या हातात लाकडी फुटपट्टी असायची ती त्या फक्त खोडकर मुलांवर डोळे मोठे करून  नुसत्या उगारायच्या. पट्टीचा वापर मात्र कधी नाही झाला.
त्या वयात गम्मत म्हणजे मला कुठलीही गोल वस्तू दिसली कि तेलंग बाई आठवायच्या, तेलंगबाई गोल,  गुलाबी गोऱ्या, सफेद साडीतच असत. (मोठा झाल्यावर समजले त्या विधवा होत्या.) वर्गात आल्याबरोबर सर्व मुलांचा ' बाई नमस्ते' चा कोरस व्हावयाचा, मग बाई पटीनेच खाली बसावयाची खुण करीत. त्यांनंतर 'मुलानो पाटी काढा' चा आदेश सुटायचा.
व बाई फळ्यावर लिहावयास लागायच्या ' बे चा पाढा, तीन चापाढा' मग  आम्ही मुले आप आपल्या  पाटीवर उतरवीत असू,
मला ह्या कृतीचा मोठा कंटाळा असे. एक तर मला पाटीवर दुधी पेन्सिल ने लिहिताना येणारा कर्कश आवाजाने अंगावर कांटा उभा राहायचा, माझे उतरवून होई पर्यंत फळा पुसला जाई,थोड्या दिवसात अंकाल्पित हेच पाढे असतात मग बाई फळ्यावर कशासाठी लिहायच्या? बरे व्हायचे काय कि पाटीला दोनच बाजू त्यामुळे भाषेच्या तासाला पाटी पुसावीच लागायची. काही मुलांकडे डबलपाटी असायची त्यामुळे त्यांना सोयीस्कर पडायचे. पण रोज पाटी न्यावी तर लागायचीच.इयता ३ रीत  पाटी गेली आणि वहीआली ती देखील चार ओळींची,अक्ष्रर वळणदार व्हावे म्हणून.
असो, मग पुन्हा पाटी पहिली ती माझ्या मुलांना कोणी भेट दिलेली.

माझ्या ७५व्या वाढदिवसाला प्रियाने, (माझ्या मुलीने,)माझी दुसरी पाटी भेट म्हणून दिली पण ही पाटी पहिल्या  पाटी सारखी नाही. कम्प्युटराईजड आहे हो आता घरा घरातून हि पाटी दिसेल तिला नोट प्याड.स्लेट,अशी नावे आहेत.
आता भेट मिळालेल्या पाटीवर मी चक्क पेंटीगस करू शकतो. अहो त्यात असलेल्या प्रोक्रीएट सौफटवेर मुळे कॅनव्हास वर  करू एवढी सुंदर पेंटिंगस होतात.
माझा वेळ ह्या पाटी मुळे उत्तम  चाललाय रोज दिवसातून मनाला स्वैर सोडून २/३ पेंटिंगस करण्याचा अवर्णीनिय आनद मी घेत आहे .
पेंटिंगस होतात छान, पण...
जो आनंद कॅनव्हास वर कुंचल्याने रंगाचे फराटे मारण्यात, रंगाने हात माख्ण्य्यात  मिळतो तो ह्या पाटीत नाही. मग कधीतरी हळूच पेपर/ कॅनव्हास काढून रंगवण्याची मज्जा लुटल्या शिवाय रहावत नाही,
जुने तेच सोने’
हे मनोमनि मान्य करावेच लागते,

*नवीन पाटीवर केलेले पेंटिंग.



No comments:

Post a Comment

चाफा आणि सोनटक्क्याचेअबोल प्रेम

 मी पाहिलंय ते अबोल प्रेम,    ते देखील दुतर्फी, विचार करा १ नाही तर ५ वर्षे  त्याचे रोज तिच्या बाकावर  नियमितपणे ती यावयाच्या पूर्वीच  हळुवा...