पुन्हा एकदा उसने.
अलीकडेच मराठी भाषा दिवस साजरा झाला.
महाराष्ट्रातील सर्व शाळा मधून इयता १० वी पर्यंत
मराठी सक्तीचे केले ऐकून खरोखरीच आनद झाला.
मराठी वांग्मय अथांग सागर
त्या साठी घ्यावे तेव्हढे जन्म थोडेच,
माझ्या सारख्या अशिक्षित माणसाला
हे आकलन होई पर्यंत आयुष्याची चांगली
७५ वर्षे सरली. ह्या भाषेच्या सागरात थोडे जरी हात पाय मारले
असते तर कमीत कमी किनाऱ्याच्या
आस पास राहून तरी पोहता आले असते,
आता ७५ व्या वर्षी हि अक्कल सुचली व नियमाने
१ तास तरी भाषे च्या सागरात बुडी मारून अंग
ओले करतो व सुखावतो.
आज ठरविल्या प्रमाणे बुडी मारली आणि हाती
बा भ बोरकरांचे जीवनाचे सार आले.
जीवन त्यांना कळले हो
सहज पणाने गळले हो
जीवन त्यांना कळले हो
जळापरी मन निर्मळ ज्यांचे ,
गेले तेथे मिळले हो
चराचरांचे होऊनि जीवन
स्नेहासम पाजळले
जीवन त्यांना कळले हो सिंधूसम हृदयात जयांच्या
रस सगळे आकळले हो
आपत्काली अन दीनांवर
घन होऊनी जे वळले हो
जीवन त्यांना कळले हो
दूरित जयांच्या दर्शनमात्रे
मोहित होऊन जळले हो
पुण्य जयांच्या उजवाडाने
फुलले अन परिमळले हो
जीवन त्यांना कळले हो
आत्मदळाने नक्षत्रांचे वैभव
ज्यांनी तुळीले हो
सायासाविण ब्रम्ह सनातन
उरींचे ज्यां आढळले हो
जीवन त्यांना कळले हो
बा. भ. बोरकर
No comments:
Post a Comment